लाईट्स कॅमेरा अ‍ॅक्शन ; ‘या’ मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात

कोरोनामूळे देशात गेल्या तीन महीन्यांपासून सर्व क्षेत्र बंद आहेत. लॉकडाऊनमूळे मनोरंजन क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चित्रीकरण बंद झाल्यामूळे मालिका पुर्णपणे बंद होत्या. चित्रीकरणाला सुरुवात कशी करणार ? हा प्रश्न सर्वांना सतावत होता. कारण मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरात कोरोनाने हाहाकार घातला आहे.

यावर उपाय म्हणून निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रीकरणासाठी दुसरे ठिकाण शोधण्यास सुरुवात केली होती. सातारा जिल्हा हा चित्रीकरणासाठी योग्य आहे. त्यामूळे त्यांना सातारा जिल्ह्यात चित्रीकरणासाठी परवानगी हवी होती.

काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अधिकाऱ्याने त्यांना ही परवानगी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई, जावली, पाटण, सातारा शहर, कास पठार, फलटण, औंध हा परिसर चित्रीकरणासाठी निर्माते, दिग्दर्शकांना कायमच खुणावत आलेला आहे.

याशिवाय साताऱ्यात वाई-मेणवली येथील घाट, ग्रामीण परिसर, कोयना, धोम, बलकवडी धरण, पाचगणी टेबललँड आदी परिसरही चित्रीकरणासाठी आकर्षित आहे.

या परिसरात मराठी चित्रपट आणि मालिकांसोबतच हिंदी, भोजपुरी भाषेतील चित्रपट, मालिका, जाहिरातींचे चित्रीकरणही सुरू असते. सातारा परिसरात चित्रीकरण हा एक मोठा व्यवसाय आहे. यातून अनेकांना रोजगार मिळत आहे.

छोट्या-मोठ्या कलाकारांना कामे मिळतात. तसेच या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होतील. यामुळे निर्मात्यांसोबतच या व्यवसायाशी जोडलेल्या स्थानिक नागरिकांचीही हे चित्रीकरण सुरू करण्याची मागणी होती.

सातारा जिल्ह्यात झी मराठीच्या ‘टोटल हुबलाक’ या मालिकेचे चित्रीकरण सर्वात पहीले सुरु झाले. त्यानंतर श्वेता शिंदे यांच्या ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली.

सातारा जिल्ह्यात अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही लवकरच सुरु होऊ शकते. या मालिकांसोबतच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘राजमाता जिजाऊ’ या मालिकांच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे.

मराठीसोबतच हिंदी मालिकांचे चित्रीकरण देखील सुरु झाले आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले आहे. पण चित्रीकरणासाठी नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत.

नियम व अटी –

1) चित्रीकरणावेळी सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे.

2) दोन व्यक्तींमध्ये एक मीटर अंतर ठेवावे.

3) हस्तांदोलन-मिठी मारणे अशा प्रकारची कृत्ये करण्यास मनाई आहे.

4) लग्न समारंभ, पूजा, सण, उत्सव, जत्रा, सामूहिक नृत्य आदी समूह दृश्यांना मनाई आहे.

5) केशरचना, मेकअपसाठी टाकाऊ वस्तू वापरणे.

6) थर्मल स्कॅनर, हात स्वच्छ करण्याचे रसायन व चित्रीकरण साहित्य स्वच्छ ठेवणे बंधनकारक आदी नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.