कोलकत्ता नाइट रायडर्स संघातील व्यंकटेश अय्यर हा खेळाडू अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. व्यंकटेश अय्यर नेहमी त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे चर्चेत असतो. पण आता व्यंकटेश अय्यर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि एका तेलुगू(Telugu) अभिनेत्रीचे अफेअर सुरु असल्याची चर्चा होतं आहे.(indian player vyanktesh ayyar affair this actress)
कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यरने तेलुगू अभिनेत्री प्रियांका जवळकरच्या एका पोस्टवर कमेंट केली होती. यावरून दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे का? अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहेत. काही दिवसांपूर्वी तेलुगू अभिनेत्री प्रियांका जवळकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता.
या फोटोवर कोलकत्ता नाइट रायडर्स संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यरने ‘क्युट’ अशी कमेंट केली होती. या कमेंटवर तेलुगू अभिनेत्री प्रियांका जवळकरने ‘कोण क्युट? तू?’ असा रिप्लाय दिला होता. यानंतर दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याची चर्चा होत आहे. अभिनेत्री प्रियांका जवळकरने तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अभिनेत्री प्रियांका जवळकरचा जन्म १२ नोव्हेंबर १९९२ ला मराठी कुटुंबामध्ये झाला होता. अभिनेत्री प्रियांका जवळकरने सुरवातीला मॉडेलिंग करत होती. तिने मॉडेलिंग करत असतानाच प्रियांका जवळकरने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. २०१७ मध्ये आलेल्या ‘काला वरम आये’ हा अभिनेत्री प्रियांका जवळकरचा पहिला चित्रपट होता.
त्यानंतर अभिनेत्री प्रियांका जवळकरने थीमारुसू, एसआर कल्याणमंडपम, टॅक्सीवाला या चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. अभिनेत्री प्रियांका जवळकरने कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी मिळवलेली आहे. तसेच तिने फॅशन डिझाईनींगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला आहे. पदवी मिळवल्यानंतर प्रियांकाने एका MNC कंपनीत काम देखील केले आहे.
तसेच अभिनेत्री प्रियांका जवळकरने सांख्यिकी विषयाचा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे. सांख्यिकी विषयाच्या अभ्यासक्रमासाठी प्रियांका अमेरिकेला देखील गेली होती. सोशल मीडियावरील फोटो पाहून तिला पहिल्या चित्रपटासाठी निवडण्यात आलं होतं. तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघातील फलंदाज ऋतूराज गायकवाड आणि मराठी अभिनेत्री सायली संजीव यांच्यामध्ये देखील अफेअर सुरु असल्याच्या चर्चा होत होत्या. मराठी अभिनेत्री सायली संजीवने ऋतूराज गायकवाड सोशल मीडियावरील एका फोटोवर कमेंट केली होती. त्यानंतर ऋतूराज गायकवाडने देखील ‘थँक क्यू’ म्हणत रिप्लाय दिला होता.
महत्वाच्या बातम्या :-
प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोन नंबर झाला लीक; विकृतांनी मेसेज, फोन करून केली शरीरसुखाची मागणी
ईडीने संपत्ती जप्त केल्यानंतर संजय राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘माझं राहतं घर जप्त केलं’
संजय राऊतांवर ईडीची मोठी कारवाई, अलिबागमधील ८ प्लॉट, दादरमधील १ फ्लॅट जप्त, राजकारणात खळबळ