इंग्लड विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताच्या ‘या’ चार खेळाडूंनी केले जबरदस्त प्रदर्शन; त्यांच्यामुळेच इंग्लंडचा झाला पराभव

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला आहे. आता विराट सेनेने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीने हा सामना जिंकून कर्णधारपदामध्ये मोठे स्थान मिळवले आहे.

या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंगल्ंडच्या संघाची सुरुवात दमदार झाली होती. पण दुपारच्या जेवणानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्याची दिशा बदलली आणि टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली. पण या विजयामध्ये ४ खेळाडूंनी महत्वाची भुमिका बजावली होती.

रोहित शर्मा
टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात सातत्याने दमदार कामगिरी करणारा रोहित शर्मा आता कसोटीतही सर्वोत्तम झाला आहे. रोहितने इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या मालिकेत टीम इंडियाला सातत्याने चांगली सुरुवात दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलंच धुतलं आहे . रोहितने परदेशी मैदानावर पहिले शतक ठोकले. रोहितने १२७ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

शार्दुल ठाकूर

टीम इंडियाचा युवा खेळाडू शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीनेच नाही तर फलंदाजीनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शार्दुलने पहिल्या डावात ५७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा भारतीय संघाच्या विकेट झटपट पडत होत्या, तेव्हा त्याने पंतसोबत शतकी भागीदारी केली. शार्दुलने दुसऱ्या डावात ६० धावा केल्या आणि संघाला चांगली आघाडी घेता आली. एवढेच नाही तर शार्दुलने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात २ बळीही घेतले.

जसप्रीत बुमराह
या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. इंगल्ंडच्या संघाची सुरुवात दमदार झाली होती. पण दुपारच्या जेवणानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्याची दिशा बदलली. पहिल्या डावात २ बळी घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. ऑली पोप आणि जॉनी बेअरस्टो त्याच्या गोलंदाजीसमोर उभे राहू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपली विकेट गमवावी लागली.

रवींद्र जडेजा
टीम इंडियाचा अष्टपैलू रवींद्र जडेजाची या सामन्यातील कामगिरीही अप्रतिम होती. सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या जडेजाने या सामन्यात कर्णधार कोहली त्याच्यावर विश्वास का दाखवत आहे हे दाखवून दिले. जडेजाने भारताला त्याची सर्वाधिक गरज असताना या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताला विकेट्स दिल्या. या सामन्यात जडेजाने एकूण ४ बळी घेतले.

महत्वाच्या बातम्या-

भारतीय संघात विराटसारखा कर्णधारच झाला नाही! ‘ही’ आकडेवारी पाहूण तुम्हीही म्हणाल खरं आहे
‘असा’ ओळखा डेंग्यु आणि सामान्य तापामध्ये फरक अन् वेळीच घ्या उपचार; वाचा सविस्तर
पुनर्विवाहानंतरही विधवेला पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.