Share

ह्युंदाईच्या ‘त्या’ ट्विटमुळे भारतीय लोक संतापले, होतेय भारतातून हकालपट्टी करण्याची मागणी

hyundai-car-tweet-

आंतरराष्ट्रीय कार निर्माता कंपनी ह्युंदाईच्या पाकिस्तानी(Pakistan) शाखेने केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे. ह्युंदाईच्या पाकिस्तानी शाखेच्या या ट्विटनंतर भारतात ट्विटरवर Boycott Hyundai (#BoycottHyundai) ट्रेंडिंग सुरू झाले आहे. वास्तविक, ह्युंदाई कंपनीच्या पाकिस्तानी शाखेच्या ट्विटमध्ये एक वादग्रस्त गोष्ट होती, ज्यावर संपूर्ण हा वाद झाला होता.(indian people are angry on hyundai car company)

आता हे ट्विट ह्युंदाई कंपनीकडून डिलीट करण्यात आले आहे. ह्युंदाई कंपनीच्या पाकिस्तान शाखेने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आपण आपल्या काश्मिरी बांधवांच्या बलिदानाचे स्मरण करूया आणि त्यांच्या समर्थनासाठी उभे राहूया जेणेकरून ते त्यांचा स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवू शकतील.”

या ट्विटमध्ये #hyundaipakistan आणि #kashmirsolidarityday असे लिहिले आहे. वास्तविक, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 5 फेब्रुवारीला काश्मीर दिवस किंवा काश्मीर एकता दिवस साजरा केला जातो. भारतातील काश्मीरमधील अत्याचारांबद्दल बोलून पाकिस्तानमध्ये या दिवशी दहशतवादी संघटना मोठ्या रॅली काढतात.

आंतरराष्‍ट्रीय कार निर्माता कंपनी असलेल्या ह्युंदाईच्‍या ट्विटमुळे भारतात खळबळ माजली आहे. भारतीय ट्विटर वापरकर्त्यांनी भारत विरोधी राजकीय भूमिका घेतल्याबद्दल ह्युंदाई कंपनीच्या पाकिस्तान शाखेला फटकारले आहे. याबाबत भाजप नेते कपिल मिश्रा यांनी ट्विट करून ह्युंदाई कंपनीने भारताची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

या ट्विटबाबत कंपनीने माफी मागितली नाही, तर कंपनीला मोठी आर्थिक किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भाजप नेते कपिल मिश्रा यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे ह्युंदाई कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा फटका बसेल, असे मत आर्थिक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या दोन दशकांपासून ह्युंदाई ही भारतात दुसऱ्या क्रमांकाची कार निर्माता कंपनी आहे.

राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ आणि पत्रकार आदित्य राज कौल यांनी या संदर्भात ट्विट करताना म्हंटले आहे की, “मी ह्युंदाईला ऑटोमोबाईल क्षेत्रातून ग्लोबल मुक्तीसाठी शुभेच्छा देतो. मी डिसेंबर २०२१ मध्ये माझी हुंडाई कार विकली याचा आनंद आहे. पाकिस्तान ह्युंदाईच्या वतीने लज्जास्पद अपरिपक्व खोटे बोलले गेले आहे. या कारवाईसाठी कंपनीच्या दहशतवादी समर्थक कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. Hyundai दहशतवादाचे समर्थन करते का?”, असा सवाल पत्रकार आदित्य राज कौल यांनी ह्युंदाई कंपनीला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लतादीदींचा शेवटचा व्हिडीओ होतोय व्हायरल, त्यांची अवस्था पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
बाप-लेकाच्या नात्याला काळीमा! वडिलांची झोपेत लाथा मारून केली हत्या, कारण वाचून हादराल
‘तुझी हिम्मत कशी झाली…’ लता मंगेशकर यांच्यासोबत अन्याय करणाऱ्यावर बाळासाहेब ओरडले तेव्हा…

इतर

Join WhatsApp

Join Now