Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 ; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 750 जागांसाठी भरती जाहीर

Indian Overseas Bank Bharti 2025 :  देशभरातील पदवीधर तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (Indian Overseas Bank) यांनी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा केली असून, एकूण 750 अप्रेंटिस पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत.

पदांची माहिती

  • अप्रेंटिस – 750 जागा

शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा

1 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.

  • एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे सवलत

  • ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे सवलत

परीक्षा फी

  • सामान्य/ओबीसी – ₹944

  • एससी/एसटी – ₹708

  • दिव्यांग (PWD) – ₹472

स्टायपेंड

निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना ₹10,000 ते ₹15,000 स्टायपेंड दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण

भरती झाल्यानंतर उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण भारतात करण्यात येणार आहे.

अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2025

  • लेखी परीक्षा तारीख – 24 ऑगस्ट 2025

पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर https://www.iob.in/ जाऊन भरतीची जाहिरात पाहावी व ऑनलाईन अर्ज सादर करावा.