म्यानमारच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी भारताचे परराष्ट्र सचिव गेले होते स्विमिंग कॉस्च्यूममध्ये

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष होते. त्यांचा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी वाय. डी. गुंडेविया यांचा एक किस्सा आपण पाहणार आहोत. शिर्षक वाचून तुम्ही थोडेसे हसला असाल ना. पण हे खरे आहे. चला तर मग जाणुन घेऊयात.

१९४९ साली एप्रिल महिन्यात म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले. आणि त्यादिवशी रविवार होता. त्यावेळी वाय. डी. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे कार्य चालवण्यासाठी एक विशेष सेवा वर्गाची निर्माती केली जाते. ज्याला भारतीय विदेश सेवा किंवा भारतीय परराष्ट्र सेवा म्हणतात. भारतीय परराष्ट्र सेवा भारताचे वेगवेगळ्या देशांत असणारे संबंध सुदृढ करण्यासाठी त्या राष्ट्रांमध्ये असणारे दूतावास सांभाळणारी सेवा आहे.

म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले, तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्च्यूममध्येच जलतरण तलावाकडे पोहण्यासाठी निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. फोनवर पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते.

स्वीय सहाय्यक म्हणाले, पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचे आहे. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले. म्हणजेच स्विमिंग कॉस्च्यूममध्ये ते पंतप्रधान यांच्याकडे गेले. त्यांनी नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, “कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत?”

त्यावेळी गुंडेविया हे शॉर्ट्स, बुशशर्ट आणि चपलांमध्ये होते. आणि त्यांच्या काखेत टॉवेल होता. “मी पोहण्यासाठी निघालो आहे,” असे गुंडेविया यांनी प्रांजळपणे सांगितले.

आणखी एका तासात म्यानमारच्या पंतप्रधानांचे विमानतळावर आगमन होईल असे नेहरूंनी गुंडेविया सांगितले.गुंडेविया यांनी त्यांना सांगितले की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असे सांगण्यात आलं होते. म्हणून मी तयार झालो नाही.

त्यावर ते ओरडून म्हणाले, “प्रोटोकॉल, कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला.” असे नेहरु गुंडेविया यांना म्हणाले. गुंडेविया नेहरूंना म्हणाले “अशा अवतारात येऊ?” तर त्यावर नेहरू ‘हो’ म्हणाले.

गुंडेविया नेहरूंच्या बरोबर गाडीत बसले. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचले तेव्हा त्यांचा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर म्यानमारचे पंतप्रधान यू नू यांचं आगमन झाले. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने गुंडेविया घरी गेले.

बघा ना ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात गुंडेविया होते. सोबत अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता. गुंडेवियासाठी काय दिवस असेल तो?

दुसऱ्या दिवशी गुंडेविया यांच्या टेबलवर एक पार्सल होते. ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेले होते. हा प्रसंग गुंडेविया यांनी ‘आऊटसाईड द आरकाईव्ह्स’ मध्ये मांडला आहे.

खरचं हासण्याचा प्रसंग असला तरी आधी काम महत्त्वाचे आहे. हेच या प्रसंगातून आपल्याला कळते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.