टॅक्स भरुनही सरकार योग्य त्या सुविधा देत नाही; श्रीमंतांसोबतच मध्यमवर्गीयांची दुसऱ्या देशात जाण्याची तयारी

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धूमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्युची संख्या पण वाढत चालली आहे. अशातच संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचाही अंदाज व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही लोक विदेशात स्थायिक होताना दिसत आहे. भारताची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे, की लोकांकडे पैसे असले तरी उपचार वेळेत मिळत नाहीये.

सध्या देशातील नागरीक विदेशात अशा ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार करत आहे, ज्या ठिकाणी आरोग्यसेवा पुराश्या आहे. कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात ऑक्सिजन, औषधांचा आणि बेड्सचा तुडवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे श्रीमंत नागरीकांसोबतच सामान्य नागरीकही परदेशात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत आहे.

काही विजा आणि इमिग्रेशन सर्विस प्रोव्हायडरच्या म्हणण्यानुसार गेल्या दोन महिन्यापासून २० टक्क्यांनी क्वेरी वाढली आहे. गेल्यावर्षीपेक्षा २५ जास्त लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

देशातील नागरीकांनी विजा आणि इमिग्रेशन सर्विस प्रोवाईडर्सला अरेमिका, कॅनाडा, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाण्यासाठी क्वेरी पाठवली आहे. तसेच ऑस्ट्रीया, आयरलँड, पोर्तुगाल, माल्टा, तुर्की या देशात जाण्याचीही काही नागरीकांनी इच्छा व्यक्त केली आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. हा परिस्थितीने सर्वांवर चुकीचा प्रभाव पडला आहे. त्यामुळे दुसऱ्या देशात स्थानिक होण्यासाठी फक्त श्रीमंतच लोकं नाही, तर मध्यमवर्गीय लोकंही प्रयत्न करत आहे.

मध्यमर्गीय लोकंही विदेशात कोणत्या ठिकाणी चांगल्या आरोग्य व्यवस्था आहे. त्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही लोकांना असे वाटत आहे, की चांगली कमाई करुन टॅक्स भरुनही सरकार योग्य त्या सुविधा देत नाही, त्यामुळे ते दुसऱ्या देशात स्थायिक होण्याचा विचार करत आहे, असेही काही विजा आणि इमिग्रेशन सर्विस प्रोव्हायडर कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; ‘या’ घटनांमुळे सतत वादात आदित्य नारायण
राजा, आमचं खूप नुकसान झालंय, शिक्षीकेचा राज ठाकरेंना फोन; राज म्हणाले काही काळजी करु नका
ऑस्ट्रेलियातील नोकरी सोडून सुरू केला महाराष्ट्रीयन जेवणाचा व्यवसाय, आज आहेत १४ रेस्टॉरंट्स

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.