Share

अमेरिकन शेअर्समधून भारतीय गुंतवणूकदार करणार मोठी कमाई, शेअर बाजाराने सुरु केली ‘ही’ सुविधा

shear market

भारतातील शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी चालून आली आहे. या संधीमुळे गुंतवणूकदारांना मोठी कमाई करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि टेस्ला यांसारख्या अमेरिकन कंपन्यांचे शेअर्स भारतातील नागरिकांना घर बसल्या विकत घेता येणार आहेत. यामधून भारतीय गुंतवणूकदार बक्कळ नफा देखील कमवू शकतात.(indian investor get more profit from american shears)

यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या( एनएसई ) इंटरनॅशनल एक्सचेन्जने ही सुविधा आणली आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेन्ज ही नॅशनल स्टॉक एक्सचेन्जची उपकंपनी आहे. एनएसई इंटरनॅशनल एक्सचेन्ज ही कंपनी गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आहे. ३ मार्चपासून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही निवडक अमेरिकन कंपन्यांचे शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकता.

ही गुंतवणूक अप्रायोजित डिपॉझिटरी पावत्या म्हणजेच डीआरद्वारे केली जाईल. या सुविधेच्या माध्यमातून सुरवातीला मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, टेस्ला, नाइकी(Nike), कोका- कोला, Apple आणि Exxon Mobil यांसारख्या ५० अमेरिकन कंपन्यांमध्ये भारतीय नागरिकांना गुंतवणूक करता येईल. यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.

या गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदारांना एनएसई इंटरनॅशनल एक्सचेन्जमध्ये डिमॅट खाते उघडावे लागेल. अमेरिकन कंपन्यांचे खरेदी केलेले हे शेअर्स विदेशी मालमत्ता म्हणून गणले जातील. या सर्व बाबींची माहिती गुंतवणूकदाराला त्याच्या आयकर रिटर्नमध्ये द्यावी लागणार आहे.या सुविधेमार्फत भारतीय गुंतवणूकदारांना परवडणारे अमेरिकन स्टॉक्स उपलब्ध होणार आहेत.

यापूर्वी काही भारतीय गुंतवणूकदार ऑनलाइन ब्रोकर्सद्वारे अमेरिकन स्टॉक्समध्ये गुंतवणूक करत होते. पण आता या दलालांना भारतीय आणि अमेरिकन नियामकांकडून काम करण्याची मान्यता मिळाली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय गुंतवणूकदार जागतिक स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.

एनएसई इंटरनॅशनल एक्सचेन्जने दिलेल्या सुविधेमुळे अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. त्यामुळे जागतिक शेअर्समध्ये भारतीय गुंतवणूकदारांचा वाटा वाढणार आहे. एनएसई आयएफएससी(NSE IFFC) नुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणे सोपे होईल आणि किंमतही जास्त नसेल.

महत्वाच्या बातम्या :-
आलिया नाही तर ‘या’ अभिनेत्रींना देण्यात आली होती ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाची ऑफर, दिग्गज अभिनेत्री होत्या स्पर्धेत
तरुण वयातही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका, जाणून घ्या कसा टाळता येईल याचा धोका
शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now