‘इंडिअन आयडल १२ ची संभाव्य विजेती षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने केला संताप व्यक्त; म्हणाली मायकल जाक्सनलाही…..

सोनी टीव्हीच्या सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडल १२ ‘ ची स्पर्धक षण्मुख प्रिया या स्पर्धेची संभाव्य  विजेती म्हणून पाहिली जात आहे. तिने आपल्या तेजस्वी आवाजाने आणि सुरांनी न्यायाधीश आणि प्रेक्षकांच्या हृदयात आपले खास स्थान बनवले आहे. आपल्या योडेलिंग कौशल्यासाठी परिचित असलेल्या या १७ वर्षीय षण्मुख प्रियाचे अनेक चाहते आपल्याला पाहायला मिळतील.

षण्मुख प्रियाला तिच्या गाण्यावर प्रयोग करायला आवडते, परंतु काही नेटकऱ्याना षण्मुख प्रियाने गायलेल्या श्रवण राठोठ यांच्या ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ या गाण्यावर टीका केली आहे.इतकेच नाही तर तिला या शोमधून वगळण्याची मागणी केली गेली. पण आता षण्मुख प्रिया आणि तिच्या आईने त्यांच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

षण्मुख प्रियाच्या म्हणण्यानुसार ती सहसा ऑनलाईन टिप्पण्या वाचण्यास प्राधान्य देत नाही. परंतु ट्रोलर्सवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ती म्हणते की, जेव्हा माझ्या काही चाहत्यांनी मला ही ट्वीट दाखविली तेव्हा मला या घटनेची माहिती मिळाली. आधी माझा अजिबात विश्वास नव्हता. परंतु तरीही त्या गोष्टीस प्रत्युत्तर देऊन मला त्या गोष्टीना पुढे वाढवायचं नाही.

या संपूर्ण घटनेविषयी बोलताना षण्मुख प्रियाची आई श्रीमती रत्नमाला म्हणाली की गेल्या तीन आठवड्यांपासून तिला प्रियाविरूद्ध बर्‍याच नकारात्मक टिप्पण्या आणि प्रतिक्रिया दिसू लागल्या आहेत. या टिप्पण्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, नवीन शैलींचा प्रयोग करण्याचा प्रयत्न शानमुख करीत आहे. ती तिच्या शैलीचा वापर करत असताना लोकांना ते ऐकायला जरा वेगळ वाटत असेल.

षण्मुख प्रियाची आई म्हणते राहिला गाण्यांच्या निवडीचा प्रश्न आहे. इंडियन आयडॉलचे सर्व स्पर्धक निर्मात्यांनी दिलेली गाणी सादर करतात. पण या सर्व टीका असूनही माझी मुलगी इतकी भाग्यवान आहे की, प्रेक्षकांकडून त्याला दुप्पट प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. आणि या गोष्टीचा मला आनंद आहे.

षण्मुख प्रिया पुढे म्हणते की, मायकेल जॅक्सनसारख्या दिग्गज कलाकारांनाही टीकेचा सामना करावा लागला. मी त्याच्या समोर एक छोटी कलाकार आहे. मला फक्त माझे संगीत माहित आहे. मी या टप्प्यावर आले आहे कारण मला गायला आणि पेरफोम करायला आवडते. आणि मी माझ गायन चांगल व्हाव यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहीन.

हे ही वाचा-

कोरोना रोखण्यासाठी देशात गृह मंत्रालयाने केले कडक निर्बंध लागू; केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

लाडक्या लक्ष्याची लेक स्वानंदीने ठेवलं वडिलांच्या पावलावर पाऊल; पहा तिची अभिनयातील पहीली झलक

कधी एअरपोर्टवर काढली पँट तर कधी तरुणीचा खाला मार; ‘या’ घटनांमुळे सतत वादात आदित्य नारायण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.