इंडिअन आयडल १२ वादाच्या भोवऱ्यात, ड्रामेबाजी करून मिळवली टीआरपी; शेवटी सगळं काही उघड झालं

‘इंडिअन आयडल १२’ हा सीजन इतर सीजन पेक्षा जास्त चर्चेचा ठरला. सतत कोणत्या ना कोणत्या प्रसंगामुळे या रियालिटी शोला नेहमी एक वेगळ वळण मिळत गेल. त्यानंतर एकामागून एक अश्या सगळ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला.

‘इंडिअन आयडल १२’ सुप्रसिद्ध रियालिटी शोमधील एक आहे. दर शनिवार आणि रविवारी प्रेक्षक हा शो बघण्यासाठी उत्सुक असत. या शोमधील अनेक प्रसंगांनी प्रेक्षकांची माने हेलावून टाकली. परंतु हे सर्व खोट असून टीआरपी साठी नाटक चालू आहे असे बोलले जात आहे. परंतु प्रेक्षकानी नाराजी व्यक्त केली आहे.

या शोच्या सुरवातीला परीक्षक नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची तयारी चालू असल्याची दाखवली. इतकेच नाही तर सेटवर दोखांच्या घरचे एकमेकांना भेटले देखील होते. तसेच त्याच्या बद्दलच्या अनेक बातम्या सोशल मिडीयावर वाचायला मिळाल्या. पण काही दिवसांनी वेगळीच सत्य परिस्थिती समोर आली आणि असे काहीच नाही असे अस समजल. म्हणजे हा ही एक टीआरपी चा भाग होता.

Indian Idol 11: नेहा की शादी से पहले खास मेहमान बनकर शो में पहुंचीं,,, -

इंडियन आयडल या शोमध्ये एकदा ८१ वर्षांचे प्रख्यात गीतकार संतोष आनंद उपस्थित झाले होते. संतोष आनंद यांनी त्यांच्या हलाखीच्या परिस्थिती बद्दल सांगितले ते ऐकून  त्यांना शोच्या न्यायाधीश नेहा कक्कड़ यांनी ५ लाख रुपये दिले होते. प्रथम गीतकाराने ते घेण्यास नकार दिला परंतु नेहा कक्कडच्या खूप विनंती नंतर ते सहमत झाले. त्यावेळीही नेहा कक्कर आणि शोच्या मेकर्स सोशल मीडियावर ट्रोल झाले होते. टीआरपीसाठी गीतकाराच्या असहायतेचा फायदा वाहिनीने घेतल्याचा आरोप नेटकऱ्यानी केला.

Neha Kakkar gives Rs 5 lakh to Santosh Anand the lyricist of “Ek Pyaar ka  Nagma” on the sets of Indian Idol 12 - Times of India

सवाई भट्टला घेऊन बऱ्याच चर्चा रंगत असतात. इंडियन आयडॉलवर सोशल मीडिया नेटकार्यांनी आणि प्रेक्षकांनी सवाईची खोटी गरिबी दाखविल्याचा आरोप केला होता. असे दाखवले की तो एका अत्यंत गरीब कुटुंबातला मुलगा आहे. त्यांचे  कठपुतळी तयार करण्याचे काम आहे, ज्यामुळे जास्त पैसे कमवत नाहीत.

पण सवाईचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी असा आरोप केला आहे की सिंगर इतक्या गरीब कुटुंबातून येत नाहीत जेवढ इंडिअन आयडलच्या शोमध्ये दाखवण्यात आले आहे. त्यानंतर या गोष्टीला घेऊनही सोशल मिडीयावर निर्मात्यांना आणि सवाईही खूप ट्रोल केले.

IN PICS Indian Idol 12 Contestant Sawai Bhatt Old Concert Photos Viral On  Social Media People Raised Questions On His Struggle Story

अलीकडेच किशोर कुमार विशेष भागात त्यांचा मुलगा अमित कुमार गेस्ट म्हणून शोचा भाग बनला होता. अमित कुमार यांनीही ‘इंडियन आयडल १२’ पोलखोल केली. शूट सुरु होण्यापूर्वीच मला स्पर्धकांचे कौतुक करायचे आहे, असे सांगण्यात आले आणि मी तेच केले असे अमित कुमारने सांगितेले.

हा एपिसोड पाहिल्यानंतर समजते की नेहा कक्कड़ आणि हिमेश रेशमिया या गायकांना सोशल मीडियावर ट्रोल केले गेले आणि असेही म्हटले होते की खूप स्पर्धकांनी किशोर कुमार यांच्यासारख्या दिग्गज गायकांचे गाणे वाईट पद्धतीने गायले. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात नाराजी निर्माण झाली.

हे ही वाचा-

नागपुरात भोंदुबाबाचा पर्दाफाश; नागीण डान्स करून कोरोना रुग्णांवर करत होता उपचार

एकेकाळी भाडे देण्यासाठी खिशात नव्हते पैसे, आज या अलिशान गोष्टी वापरून जगतोय राजा सारखे जीवन

वा आजी! पुण्यात भाजी विक्री करणाऱ्या आजीने कोरोना रुग्णांसाठी दिले १ लाख रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.