जाणून घ्या किती मानधन घेतात ‘इंडिअन आयडल १२’ चे परीक्षक नेहा, विशाल आणि हिमेश रेशमिया?

‘इंडिअन आयडल १२’ सर्वाधिक लोकप्रिय शो मधील एक शो म्हणून ओळखला जातो. या शोची सतत चर्चा आपल्याला ऐकायला मिळते. या शोमधील स्पर्धकांना एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम आसलेल आपल्यला पाहायला मिळते. तसेच स्पर्धकांनी आपल्या सुरांनी चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

वाढत्या कोरोनामुळे या शोमध्ये गेल्या काही एपिसोडमध्ये बदल करण्यात आले आहे. गेल्या काही एपिसोडमध्ये तिन्ही जज गैरहजर दिसले. त्यांच्या जागी अन्नू मलिक आणि मनोज मुंतशीर हे जज म्हणून होते. तसेच शोचा होस्ट आदित्यला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या ऐवजी जय भानुशाली शो होस्ट करताना दिसला.

‘इंडिअन आयडल’ शो  त्यातील स्पर्धकांमुळे, जजमुळे तर कधी शोमध्ये येणाऱ्या पाहुण्यांमुळे यंदाचा सीजन खूप गाजला गेला. या शोमध्ये कॉमेडी क्विन भारती आणि तिचा नवरा हर्ष यांनाही बोलवण्यात आले होते. त्यांनीही प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.

या शो मध्ये पाहुणे म्हणून एआर रहमान, जया प्रदा, आनंदजी, जितेंद्र, एकता कपूर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, रेखा आणि नीतू कपूर यांसारख्या अनेक पाहुण्यांमुळे शो फुलत गेला. तसेच शोचे स्पर्धक अरुणिता कांजीलाल, पवनदीप राजन, सवाई भट्ट, शन्मुख प्रिया, सायली कांबळे अश्या सगळ्या स्पर्धकांनी चाहत्यांना प्रभावित केले.

नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया यांना जज म्हणून आपण ओळखतच आहोत पण आज आपण या तिन्ही जजच मानधन पाहणार आहोत. नेहा काक्क्डच्या आवाजाच कोण दिवाण नाही, सगळ्यांनाच तिचा आवाज तिचे व्हिडीओ आवडतात. मिळालेल्या वृतानुसार नेहा कक्कड एका एपिसोडचे  सुमारे ५ लाख रुपये इतके मानधन घेते.

गायक आणि कंपोजर असलेले विशाल दादलानी नेहा पेक्षा थोडे कमी मानधन घेतात. रिपोर्टरनुसार, ते एका एपिसोडचे सुमारे ४.५  लाख इतके मानधन घेतात. तर बॉलीवूडची हिट गाणी गायलेले हिमेश रेशमिया एका एपिसोडचे सुमारे ४ लाख इतके मानधन घेतात.

तर शोचे स्वरूप कळते असा शोचा होस्ट आदित्य नारायण एका एपिसोडचे २.५ लाख रुपये इतके मानधन घेतो. तसेच हाती आलेल्या माहितीनुसार आता पुन्हा विशाल दादलानी, हिमेश रेशमिया, आणि नेहा कक्कड एकत्र येऊन शुटींग पूर्ण करणार आहे. म्हणजेच चाहत्यांना पुन्हा त्यांच्या आवडीच त्रिकुट पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा-

शिव नादर: खाजगी नोकरी सोडून मित्रांच्या मदतीने सुरू केली कंपनी, आज आहेत १.७० लाख कोटींचे मालक

कोरोना लस टोचताच अंकिता लोखंडेने सुरु केला स्वामींचा जप; पहा तिचा मजेदार व्हिडिओ

धक्कादायक! पतीचा कोरोनाने मृत्यू, पत्नीने दोन मुलांसह घेतले विष; क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.