इंडियन आयडॉल फॅन्सने दानिश व शनमुख प्रिया यांना कार्यक्रमातून काढण्याची केली मागणी; वाचा का होतेय ही मागणी

अलीकडच्या काळात इंडियन आयडॉल १२ बऱ्याच वेळा वादात सापडला आहे. अलीकडे एक वाद असा झाला आहे की किशोर यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार याने म्हटले होते की, त्याला शोमधील प्रत्येक स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते.

स्पर्धकांचे कौतुक केल्यावर चांगले पैसे मिळत असल्याचे पण त्याने यावेळी म्हटले होते. प्रेक्षकांनी आता तर या कार्यक्रमातून दोन स्पर्धकांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्या दोन स्पर्धकांचे नाव मोहम्मद दानिश आणि शानमुखा प्रिया असे आहे.

प्रेक्षक त्यांना काढून टाकण्याची मागणी करताना म्हणतात की, ते प्रिया एकाच शैलीत गाणे गाते. तिला इतर कोणतेही गाणे येत पण नाहीत. ती गाणे गाताना फक्त किंचाळते. तिच्या गाण्याला सूर पण नसतात.

लोक मोहम्मद दानिश बद्दल बोलताना म्हणतात की, तो गाणे गाताना ओरडतो आणि त्याच्या गाण्याला सूर पण नसतो. मागच्या आठवड्यात अशी एक घटना घडली होती की त्यात सेलिब्रेटींना पण ट्रोल करण्यात आले होते.

मागच्या आठवड्यात हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कर दोघांनीही किशोर कुमार यांची गाणी गायली होती. त्यावेळी पण त्या दोघांना ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता मोहम्मद दानिश आणि शानमुख प्रिया यांना पण ट्रोल करण्यात येत आहे.

एका युझरने ट्विटरवर याबाबत लिहिले आहे की, ‘इंडियन आयडॉलचे गायक गाणे म्हणत नाहीत, किंचाळत आहेत. काही गायक खरोखर ओरडत असतात.’ तर यावर दुसरा एकजण म्हटला आहे की, आयोजकांना दानिश आणि शानमुख प्रिया यांना गाण्यापासून थांबवा. सर्व गाणे गाताना दोघे चिडचिडे असतात.

ताज्या बातम्या
जगातली सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर, एकाच चार्जमध्ये धावते २४० किमी; किंमत फक्त..

‘सोनू के टिटू की स्वीटी’ फेम अभिनेत्री आहे करोडोंच्या संपत्तीची मालकिण; पहा तिच्या मुंबईतील आलिशान घराचे फोटो

मंडपातून फरार झाला नवरदेव, पाहूण्यानेच संधी साधत नवरीसोबत घेतले सातफेरे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.