Share

Indian Idol 13 : ‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकच्या ‘त्या’ कृतीवर भडकले नेटकरी

singer Neha and Falguni

Indian Idol 13 : गायिका नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यातील वाद हा सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. या दोघांच्या भांडणाचे कारण म्हणजे नेहा काक्कारच गान ‘ओ सजना’. या गाण्याचे रिमिक्स आऊट झाल्यापासून सोशल मीडियावर नेहा कक्कर तसेच या गाण्याची मूळ गायिका फाल्गुनी पाठकही युजर्सच्या निशाण्यावर आली आहे.(Indian Idol 13, Singer, Neha Kakkar, Falguni Pathak)

मात्र, या भांडणात दोघांचा ‘इंडियन आयडॉल 13’च्या स्टेजवरून गरबा खेळतानाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर युजर्सनी त्यांच्या भांडणाला ड्रामा म्हणत ट्रोल केले. पण आता नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठकने हा नवरात्री स्पेशल एपिसोड सुरू होण्यापूर्वी शूट केला होता.

वृत्तानुसार, त्यांच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, ‘इंडियन आयडॉल’चा हा विशेष भाग नवरात्रीपूर्वी शूट करण्यात आला होता. एका सूत्राने सांगितले की, “या विशिष्ट सेगमेंटला ऑडिशन राऊंडमध्येच शूट करण्यात आले होते. ऑगस्टमध्ये त्याचे शूटिंग झाले होते.

ज्यावेळी वाद झाला त्यावेळी हा व्हिडीओ योगायोगने समोर आला आहे. तिने नवरात्रीसाठी चंक शूट केले होते, त्यावेळी नेहा कक्करने फाल्गुनी पाठकसोबत चांगले बॉन्डिंग शेअर केले होते. रिपोर्ट्समध्ये पुढे म्हटले आहे की, ‘नेहा कक्करला फाल्गुनी पाठकबद्दल बोलायचे नाही आणि ती या बाबतीत स्पष्ट आहे की ती विशिष्ट एपिसोडचे प्रमोशनही करणार नाही किंवा तिला त्याबद्दल बोलायचे नाही.

https://twitter.com/SonyTV/status/1573915203489644547?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1573915203489644547%7Ctwgr%5Ed6eff1234ed433202aa77921990fa635b699e1a1%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.dnaindia.com%2Fhindi%2Fentertainment%2Ftelevision%2Fnews-fact-check-neha-kakkar-falguni-pathak-patch-singers-together-share-stage-indian-idol-13-o-sajna-recreation-4053032

नेहा कक्करच्या सूत्रांकडूनच नव्हे तर फाल्गुनी पाठकच्या बाजूनेही हे भाग 20 ऑगस्टपूर्वी शूट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. सोनी टीव्हीने नुकताच इंडियन आयडॉल 12 चा एक व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये नेहा कक्कर फाल्गुनी पाठकचे स्वागत करत तिला ‘लिजंडरी’ म्हणत आहे तर स्पर्धक आणि जजसोबत गरबा खेळताना दिसत आहे.

नेहा कक्कर आणि फाल्गुनी पाठक यांच्यात शाब्दिक वाद सुरू आहे. एकीकडे फाल्गुनी पाठक तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘ओ सजना’ गाण्याला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद शेअर करत आहे. तर दुसरीकडे नेहा कक्करने फाल्गुनी पाठकचे नाव न घेता एक इन्स्टा स्टोरी पोस्ट करून त्यांना ऐकवल. सोशल मीडियावर दोघींमधील भांडण अजूनही सुरूच आहे.

महत्वाच्या बातम्या
Bipin Kadam: बायको आजारी असल्यामुळे दिव्यांग लेकीला ‘अशी’ दिली स्पेशल आई; बापाची आयडीया पाहून थक्क व्हाल
World Cup: वर्ल्ड कप आधीच धोनीने केली मोठी भविष्यवाणी, म्हणाला, लिहून घ्या, पुढचा वर्ल्ड कप…
Uddhav Thackeray : शिंदे सरकारकडून आणखी एक धक्का; उद्धव ठाकरेंनी गोरगरिबांसाठी सुरू केलेली ‘ती’ योजना बंद करणार

बाॅलीवुड इतर ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now