चक दे इंडिया! ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, पहा निर्णायक गोल

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने आज ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केला. यामुळे सर्व भारतीयांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या विजयासोबत भारतीय महिलांनी प्रथमच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

या सामन्यातील एकमेव गोल भारतीय ऑलम्पिक संघाकडून ट्विट करण्यात आला आहे. भारताकडून गुरजीत कौरने केलेल्या एकमेव गोलच्या व्हिडीओला तुफान लाईक्स पडत आहेत. या सामन्यात दोन्ही संघामध्ये चुरशीचा आणि अटीतटीचा खेळ दिसून येत होता. अखेर भारताचा विजय झाला.

ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचा सामना भारतीय महिलांसाठी कठीण मानला जात होता. कारण ऑस्ट्रेलिया संघ अधिक बलाढ्य मानला जात होता. पण या सामन्यातील ४ क्वार्टरमध्ये ६० मिनिटांपर्यंत अप्रतिम हॉकीचे दर्शन घडवत भारतीय महिलांनी विजय मिळवला.

या सामन्यात दोन्ही संघ गोल करण्याचे प्रयत्न करत होते पण यश कोणालाच येत नव्हते. भारतीय महिला हॉकी संघाने आपल्या भारदस्त संरक्षण आणि आक्रमक प्रदर्शन या सामन्यात दाखवले. यामुळे हा विजय सोपा झाला.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारताच्या गुरजीतने सामन्यातील एकमेव गोल केला आणि १-० ची आघाडी घेतली. दुसरीकडे गोलकीपर सविताने भिंत बनून ऑस्ट्रेलियाचे हल्ले परतवून लावले. ज्यामुळे सामन्यात भारत विजयी झाला. यामुळे भारतीय टीमचे कौतुक होतं आहे.

ताज्या बातम्या

विचित्र घटना! पिझ्झा खाताच मुलाच्या तोंडातून वाहू लागलं रक्त अन् मग…; वाचा संपूर्ण प्रकरण

महसूल दिनानिमित्त मोठ्या बदलांची घोषणा, जमिनीच्या खोट्या नोंदी बंद, जाणून घ्या नवीन बदल..

मोठी बातमी! पूजा चव्हाण प्रकरणातील ‘ते’ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती? राठोड यांच्या अडचणीत वाढ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.