Share

Uttar Pradesh : धक्कादायक! १८ वर्षांच्या तरुणीचा आईच्या डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू; ११ वर्षांच्या भावावर कोसळलं दु:खाचं सावट

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur City UP) येथे रविवारी घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. स्वप्नातील घर पाहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणीचा आईच्या डोळ्यांदेखत विजेच्या जबर धक्याने मृत्यू झाला. आईच्या हाका-पुकारात लेकीनं तडफडत प्राण सोडले आणि काही क्षणांतच आनंदी कुटुंब उध्वस्त झालं.

मायलेकींचं स्वप्न क्षणात चकनाचूर

गुलहरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमरा (Semra Village Area) भागात राहणाऱ्या शशीबाला मौर्य (Shashibala Maurya Teacher) या शिक्षिका पतीच्या निधनानंतर मुलगी साक्षी (Sakshi Maurya Girl) आणि ११ वर्षीय मुलगा श्रेयांश (Shreyansh Minor Boy) सोबत राहत होत्या. आयुष्य हळूहळू स्थिरावलं होतं. नव्या घरासाठी त्यांनी मुगलहा (Mughalha Area Gorakhpur) येथे जमीन खरेदी करून बांधकामही सुरू केलं होतं.

रविवारी मायलेकी नव्या घराच्या पाहणीसाठी गेल्या. दुसऱ्या मजल्यावरून साक्षी बाल्कनीतून बाहेर डोकावत असताना उघड्या तारेला स्पर्श झाला. एका क्षणात विजेचा जोरदार शॉक बसला आणि तिचं आयुष्य संपलं.

आईसमोरच लेकीचा मृत्यू

आई शशीबाला यांच्या डोळ्यांदेखत मुलगी तडफडत जीव सोडताना पाहून त्या कोसळल्या. शेजाऱ्यांनी धाव घेत साक्षीला रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आधी पती आणि आता लेकीच्या निधनाने शशीबाला पूर्णपणे कोलमडल्या आहेत. “आता माझ्यासाठी काहीच उरलं नाही, मी हे सर्व कोणासाठी करत होते?” असे शब्द त्यांच्याकडून उमटत होते.

११ वर्षांच्या श्रेयांशवर दु:खाचा डोंगर

आपली बहीण गमावलेल्या श्रेयांशच्या डोळ्यांसमोर सतत आईची शुद्ध हरपतेय. नुकत्याच घरप्रवेशाची स्वप्नं रंगवणाऱ्या या कुटुंबाचं जगणं एका क्षणात उद्ध्वस्त झालं. शनिवारपर्यंत आनंदाने भरलेलं घर आज दु:खाच्या सावटाखाली आहे.

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now