ओडिसा राज्यातील बारगड जिल्हयातील एका शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीचे झाड लावले आहे. ही जगातील सर्वात महागडी आंब्याची प्रजाती आहे. या आंब्याला अडीच लाख ते तीन लाख रुपये प्रति किलो असा दर असतो. निलाथर गावातील चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने मियाझाकी प्रजातीच्या आंब्याच्या(Mango) झाडाची लागवड केली आहे.(indian farmer Ripe special mang)
चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याने सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून मियाझाकी प्रजातीचा आंबा पिकवला आहे. या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळतो. मियाझाकी प्रजातीच्या आंब्याला बाजारात प्रति किलो अडीच ते तीन लाख रुपये अशी किंमत मिळते. यामुळे सध्या आसपासच्या परिसरात चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याची चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याचा जन्म निलाथर या खेडेगावात झाला आहे. चंदू सत्य नारायण यांनी आपले प्राथमिक शिक्षण देखील पूर्ण केले नाही. चंदू सत्य नारायण यांनी हा आंबा बांगलादेशमधून आणला होता. त्यानंतर चंदू सत्य नारायण यांनी या आंब्याच्या प्रजातीचे योग्य पद्धतीने संगोपन केले.
मियाझाकी प्रजातीचा आंबा पिकवण्यासाठी चंदू सत्य नारायण यांनी सेंद्रिय पद्धतीचा उपयोग केला आहे. चंदू सत्य नारायण यांनी सरकारकडे आंबे विकत घेण्याची मागणी केली आहे. तीन वर्षांपूर्वी चंदू सत्य नारायण मियाझाकी प्रजातीचा आंबा आणण्यासाठी बांगलादेशला गेले होते. त्यावेळी चंदू सत्य नारायण यांनी आंब्याच्या कोय आणल्या होत्या.
मियाझाकी प्रजातीचा आंबा पिकवण्यात यश मिळवल्याबद्दल सहाय्यक कृषी संचालक वासुदेव प्रधान यांनी चंदू सत्य नारायण या शेतकऱ्याचे अभिनंदन केले आहे. “एवढा महाग आंबा पिकवणारा चंदू सत्य नारायण हा राज्यातला पहिला शेतकरी आहे. यापूर्वी कोणत्याही शेतकऱ्याला हा आंबा पिकवण्यात यश आलेले नाही”
“चंदू सत्य नारायण यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून हा आंबा पिकवला आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे”, असे सहाय्यक कृषी संचालक वासुदेव प्रधान म्हणाले आहेत. मियाझाकी प्रजातीच्या आंब्याचे मार्केटिंग करण्यासाठी आम्ही योजना तयार करत आहोत, असे देखील कृषी संचालक वासुदेव प्रधान यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेने डावलल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; राजकीय समीकरण बदलणार?
प्राजक्ता माळीच्या आधी ‘या’ मराठी अभिनेत्रींनी दिलेत बोल्ड सिन्स, सर्व मर्यादा केल्या होत्या पार
हर्ष गोयनकांनी एका अरबपतीला विचारले, ब्रँड का घालत नाही? उत्तर वाचून तुम्हीही फालतू खर्च थांबवाल