काहीही झालं तरी पाचव्या सामन्यात ‘या’ खेळाडूला बाहेर बसवू नका; गावस्करांचा टिम इंडीयाला सल्ला

भारतीय क्रिकेट संघ साध्या इंग्लंडमध्ये ५ टेस्ट सामन्यासाठी गेला असून भारताने इंग्लंडवरती २-१ अशी पकड बनवत संपूर्ण मालिका आपल्या खिशात घालण्याचा मनसुबा बनवला आहे. इंग्लंड सोबत झालेल्या निराशाजनक पराभवानंतर भरताने एकदम दमदार कमबॅक घेत इंग्लंडला ओव्हलमध्ये चारी मुंड्या चीत केले.

सामना सुरू होण्याआधी संघ निवडीवरून भारतीय संघाच्या निवड समितीला टीकेचे धनी व्हावे लागले होते. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी, ईशांत शर्मा आणि आर आश्विन यांना संघात स्थान मिळाले नव्हते. आपले प्रमुख २ जलद गोलंदाज आणि एक फिरकीपटू यांना संघाच्या बाहेर ठेऊन देखील संघाने चौथा सामना आपल्या नावे केला.

ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांना संघात स्थान मिळाले होते. उमेशने दोन्ही डावांत प्रत्येकी ३ गाडी बाद केले तर शार्दुल ने ३ विकेट्स घेत २ अर्ध शतक झळकावले. शेवटचा सामना हा निर्णायक असल्याने संघात बदल होणार की तोच संघ घेऊन विराट मैदानात उतरणार यावर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान माझी कर्णधार सुनील गावसकर यांनी पाचव्या सामन्यात बदल होण्याचे संकेत दिले आहेत.”मोहम्मद शमीला संघात स्थान दिलं पाहिजे यामध्ये काही शंका नाही. प्रश्न फक्त इतकाच आहे की, मोहम्मद शमीला सिराजच्या जागी संधी मिळणार का? फॉर्ममध्ये नसणाऱ्या सिराजची जागी मोहम्मद शमीसाठी एकमेव संधी मला दिसत आहे.

पण त्याला संघात घेतलं पाहिजे याबाबत दुमत नाही” असे गावसकर यांनी एका स्पोर्ट्स चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. बुमराहला संघात स्थान द्यावं की विश्रांती द्यावी यावर बोलताना गावसकर म्हणाले की “माझ्या मते तुम्ही अजुनही मालिका खेळत असून जिंकलेला नाहीत. त्यामुळे बुमराहला खेळवावं लागेल”.

सद्य परिस्थितीत भारताने मालिकेमध्ये २-१ ची आघाडी घेतली असली तरी मलिका विजयासाठी ५ वां सामना हा महत्वाचा असून बुमराह सारख्या प्रमुख गोलंदाजाला बाहेर ठेवणं विराट कोहलीला नुकसानीचे ठरू शकते असा सूचक इशारा गावसकर यांनी दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सामन्यात विराट तोच चमू घेऊन मैदानात उतरतो की त्यात काही बदल होणार हे पाहणे क्रिकेट रसिकांसाठी उत्सुकाचे ठरेल.

 

महत्वाच्या बातम्या
नवरा असुदे कारागृहात, बाप्पाचे आगमन होणार थाटामाटात, अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडे बाप्पा होणार विराजमान
Hindustan 10: भारतात बनवली गेलेली ती पहिली कार जिला पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची उडायची झुंबड
‘ब्राह्मण समाजाबद्दल चुकीची माहिती पसरवण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा ब्राह्मण होते’
सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा नवीन म्यूझिक व्हिडिओ होणार लवकरच रिलीज; फोटो पाहून चाहते भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.