Share

KKR डुबली पण श्रेयस अय्यरने IPL मधून कमावला बक्कळ पैसा, घेतली ‘इतक्या’ कोटींची मर्सिडीज

टीम इंडियाचा फलंदाज आणि कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Ayyar ) एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. श्रेयस अय्यरने मर्सिडीज कंपनीची AMG G 63 4matic SUV ही कार खरेदी केली आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नवीन मर्सिडीज कार सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (indian cricketer shreyas ayyar buy new mercedese car )

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने खरेदी केलेल्या मर्सिडीज कारची किंमत तब्बल २.४५ कोटी रुपये आहे. मुंबईमधील मर्सिडीज- बेंझ लँडमार्क कार्सने हा श्रेयस अय्यरचा कार खरेदी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत मर्सिडीज- बेंझ लँडमार्क कार्सने एक पोस्ट देखील शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये मर्सिडीज- बेंझ लँडमार्क कार्सने लिहिले आहे की, “नवीन मर्सिडीज-बेंझ जी 63 खरेदी केल्याबद्दल भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरचे अभिनंदन. स्‍टार कुटुंबात आम्ही तुमचे स्वागत करतो. आम्ही आशा करतो की आम्हाला तुमच्‍या कव्‍हर ड्राईव्‍ह पाहण्यामध्ये जितका आनंद मिळतो, तितकाच आनंद तुम्हाला ही स्टार चालवण्यात मिळेल.”

कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरकडे भरपूर महागड्या कार आहेत. त्याच्याकडे LAMBORGINI Huracan Supercar तसेच Audi RS 5 या महागड्या कार आहेत. आता या ताफ्यात मर्सिडीज कंपनीची AMG G 63 4matic SUV ही कार दाखल झाली आहे. ही कार फक्त ४.५ सेकंदात ० ते १०० kmph स्पीड पकडते.

श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या कोलकाता नाइट रायडर्सची यंदाच्या आयपीएलमध्ये कामगिरी फारशी चांगली झाली नाही. कोलकाता नाइट रायडर्स संघाला यंदाच्या आयपीएलमध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नाही. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना विकत घेतले.

यापूर्वी श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांमध्ये ३०.८४ च्या सरासरीने ४०१ धावा केल्या. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. २७ वर्षीय श्रेयस अय्यरने आतापर्यंत आयपीएलमध्ये १०१ सामने खेळले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
तुम्ही कोणता सामाजिक न्याय केलाय? मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडेंना झाप झाप झापले
अहिल्यादेवींना राजमाता म्हणू नका, राजमाता पायलीच्या पन्नास पडल्या आहेत, अनिल गोटेंचे वादग्रस्त वक्तव्य
घरच्यांनी शिकू न दिल्याने आणि मनाविरूद्ध लग्न लावल्याने ११ वीच्या मुलीने घेतला गळफास

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now