मोठी बातमी! WTC फायनलसाठी भारतीय संघाची यादी जाहीर; केएल राहूलसह या मोठ्या खेळाडूंना संधी नाही

न्युझिलंडविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कोण असणार आहे, याची घोषणा करण्यात आली आहे. अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा बीबीसीआयने केली आहे.

लंडन दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जाणाऱ्या २० सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये १५ सदस्यांची निवड ही १८ जूनपासून सुरु होणाऱ्या WTC Final सामन्यासाठी करण्यात आली आहे. तसेच न्युझिलंडच्या संघानेही १५ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

या सामन्यासाठी भारताने रोहित शर्मासोबत शुभमन गिलला संधी दिली आहे. तर रिषभ पंत आणि वृद्धिमन सहा या दोन्हींना यष्टिरक्षकांचा समावेश केला गेला आहे. १५ सदस्यीय संघात २ स्पिनर, ५ फास्ट बॉलर, २ विकेट किपर आणि ६ बॅट्समॅन असे १५ सदस्य आहे.

६ बॅट्समनमध्ये शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी असे खेळाडू आहे. तर फास्ट बॉलरमध्ये इशांत शर्मा मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव अशा खेळाडूंचे नाव आहे.

तसेच दोन स्पिनर म्हणून आर. अश्विन आणि रविंद्र जडेजा यांची निवड करण्यात आली आहे. दोन रिषभ पंत आणि वृद्धिमन सहा यष्टिरक्षकांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तीन फास्ट बॉलरमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे असण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्यापैकी कोणाला संघात स्थान दिले जाईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

तर भारतीय संघाच्या १५ सदस्यांमध्ये स्पिनर अक्षर पटेलला जागा नाही मिळाली. अक्षर पटेलने इंग्लडविरोधात चांगली कामगिरी केली होती. तर ऑस्ट्रेलिया सिरिजमध्ये महत्वाची कामगिरी बजावणारे वॉशिंग्टण सुंदर, मयंक अग्रवाल, शार्दुल ठाकूर, आणि केएल राहूल यांना १५ सदस्यांमध्ये जागा मिळाली नाही.

महत्वाच्या बातम्या-

अंकिता लोखंडेची बॉयफ्रेंड विक्की जैनसाठी इमोशनल पोस्ट, म्हणाली, तु जगातला बेस्ट…
वॅक्सीन घेतल्यानंतर ताप आला तर नेमकं काय समजायचं? जाणून घ्या एका क्लिकवर
धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.