शास्त्रींच्या राजीनाम्यानंतर कोण होणार भारतीय संघाचा नवा प्रशिक्षक?; वेगळेच नाव आले आघाडीवर

यूएईमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षक पदासाठी नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. असे वृत्त आहे की, बीसीसीआय या पदासाठी माजी भारतीय खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अनिल कुंबळे यांच्याशी बोलू शकते.

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून अनिल कुंबळेंना ज्या प्रकारे काढून टाकण्यात आले, त्यावर बोर्ड खूश नसल्याचा खुलासा बीसीसीआयच्या एका सूत्राने केला आहे. आणि त्यांना आणखी एक संधी द्यायची आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की प्रशासकांच्या समितीने भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या दबावाखाली अनिल कुंबळेला पदावरून काढून टाकले होते. आणि आता हा निर्णय सुधारला जाऊ शकतो.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले, अनिल कुंबळेला ज्या पद्धतीने काढून टाकण्यात आले त्यात सुधारणा आवश्यक आहे. ज्या प्रकारे सीओएने कोहलीच्या दबावाखाली कुंबळेंला काढून टाकले, तो योग्य मार्ग नव्हता. दरम्यान, कुंबळे आणि लक्ष्मणवर अवलंबून आहे की त्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे की नाही.

सुत्रांकडून असेही समजले आहे की केवळ काही निवडक लोक मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. बीसीसीआयच्या एका सूत्राने याबद्दल सांगितले की, बीसीसीआयचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड होण्याची त्या लोकांची शक्यता आहे, ज्यांनी खेळाडू म्हणून चांगले विक्रम केले आहे आणि ज्यांना प्रशिक्षणाचा अनुभव आहे, तेच या पदासाठी अर्ज करू शकतात.’

भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्याबाबत विचारले असता, सूत्राने सांगितले, ते इच्छुक असल्यास अर्ज करू शकतात परंतु त्यांच्याकडे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पात्रता नाही. विक्रम सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सर्वोत्तम आहे. तसेच जेव्हा आपण नवीन प्रशिक्षक निवडतो, तेव्हा त्याच्याकडे स्वतःची एक टीम असते. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

२०१६ मध्ये अनिल कुंबळेंना रवी शास्त्रींच्या जागी भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवण्यात आले. हा निर्णय भारतीय बोर्डाच्या क्रिकेट सल्लागार सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांनी संयुक्तपणे घेतला.

मात्र, विराटशी मतभेद झाल्यामुळे आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हरल्यानंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता मंडळ पुन्हा एकदा त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्याचा विचार करत आहे.

लक्ष्मण यांच्याबद्दल बोलत असताना, ते भारतीय क्रिकेटचे एक मोठे नाव आहे. भारतासाठी दीडशेहून अधिक कसोटी सामने खेळणारे लक्ष्मण गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादच्या प्रशिक्षकही आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.