‘तो’ शब्दही घाणेरडा; घटस्फोटानंतर शिखर धवनच्या बायकोची भावूक पोस्ट वाचून तुम्हीही हळहळाल

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी या दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. याबद्दल शिखर धवनची पत्नी आयेशा धवन हिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून सांगितलं आहे. धवन आणि आयेशा या दोघांचं २०१२ मध्ये लग्न झाले. शिखर धवन आणि आयेशा यांना एक मुलगा आहे.

घटस्फोटाच्या संदर्भात आयेशाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, घटस्फोट हा शब्दही घाणेरडा होता पण माझा घटस्फोट दोनदा झाला एका शब्दाची इतकी ताकत मी घटस्फोटित असताना अनुभवली आहे. पहिल्यांदा घटस्फोट झालं तेव्हा ,मी फारच घाबरले होते.

मला वाटत होत की मी अपयशी ठरले पण त्यावेळी मी चुकीची होती . सर्वांची मान शरमेनं खाली घातली मी स्वार्थी होती असं मला वाटत होत मी आईवडिलांना निराश करतेय असं वाट होत… खूपच वाईट होता घटस्फोट. असं तिने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

खरतरं सोशल मीडियाचा प्रभाव सध्याच्या काळात लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांवर आहे. हे जग आभासी असले तरी यातून लांबची माणसे जोडली जातात. मात्र समोरची व्यक्ती कोण आहे, कशी आहे, तिचा स्वभाव इत्यादी गोष्टी या आभासी जगात समजत नाहीत.

आयेशा आणि शिखर धवन हे दोघेही फेसबुकच्या माध्यमातून भेटले होते. क्रिकेटर हरभजन सिंग फेसबुकवर शिखर धवन आणि आयेशा यांचा म्युच्युअल फ्रेंड होता. आयेशाला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. शिखर धवननेच आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. नंतर आयेशाने ती स्वीकारली होती.

शिखर धवनच्या परिवाराकडून या लग्नाला विरोध होता त्यांना लग्नासाठी राजी करणे खूप कठीण होते. पण त्याने याचा सामना करून परिवाराला तयार केलं आणि ते दोघेही २०१२ मध्ये लग्नबंधनात अडकले आयेशा ही शिखर धवनपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. आयेशा हिला किक बॉक्सिंगमध्ये आवड आहे. ती प्रशिक्षित किक बॉक्सर आहे.

 

महत्वाच्या बातम्या
देव तरी त्याला कोण मारी! मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या तरुणाच्या पांघरुणात शिरला कोब्रा, जाग आली अन्…
अजयच्या मुलीला करावा लागला वर्णभेदाचा सामना; अखेर कंटाळून मुंबई सोडून सिंगापूरमध्ये काढला पळ
ठाकरे सरकारला मोहरमची गर्दी चालते पण गणेशोत्सावासाठी लोक निघाले की लगेच यांचा कोरोना निघतो- नितेश राणे
साधा साप म्हणून तरुणाने घेतला नागाशी पंगा, त्यानंतर पहा काय झालं; समोर आला भयानक व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.