सध्या रशिया(Russia) आणि युक्रेन(Ukren) या दोन देशांमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. यादरम्यान, भारतीय हवाई दल पोखरणमध्ये आपले सर्वात मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे. ७ मार्चला भारतीय हवाई दलाचा हा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम दर तीन वर्षातून एकदा आयोजित केला जातो. या सराव कार्यक्रमात भारतीय लष्कराची सर्व लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर सहभागी होत आहेत.(indian air force practice programme vayu shakti)
भारतीय हवाई दलाच्या या सराव कार्यक्रमाचे नाव ‘वायू शक्ती’ असे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भारतीय हवाई दलाचे हे शक्ती प्रदर्शन पार पडणार आहे. या सराव कार्यक्रमात भारतीय हवाई दल थेट फायरिंग ऑपरेशन करणार आहे. म्हणजेच या ऑपरेशन दरम्यान, पंतप्रधान लढाऊ विमानांना कोणाला लक्ष्य करायचे हे सांगतील आणि विमानाचे पायलट क्षेपणास्त्रांद्वारे त्या लक्ष्यावर मारा करतील.
पाकिस्तानच्या सीमेच्या अगदी जवळ असणाऱ्या पोखरण रेंजमध्ये ‘वायू शक्ती’ हा सराव कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमात प्रथमच भारतीय वायुसेनेची अत्याधुनिक लढाऊ विमाने सुपरसॉनिक वेगाने उडताना दिसणार आहेत. भारतीय वायुसेनेची ही अत्याधुनिक लढाऊ विमाने हवेतून क्षेपणास्त्रांचा मारा करणार आहेत.
हवाई दलाचे सह-प्रमुख एअर मार्शल संदीप सिंग यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत एअर मार्शल संदीप सिंग म्हणाले की, वायु-शक्ती सराव हा केवळ देशाच्या हवाई शक्तीच्या सामर्थ्याचे प्रदर्शनच नाही, तर आमच्यासाठी युद्ध ऑपरेशनल प्रशिक्षणाचा एक डोस आहे.
या शक्ती प्रदर्शनात एकूण भारतीय वायुसेनेची १४८ लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. त्यापैकी नल एअरबेसवरून १८ विमाने, फलोदी एअरबेसवरून २९, जोधपूरहून ४६, जैसलमेरहून ३०, उत्तराईहून २१, आग्राहून २ आणि हिंडन एअरबेसवरून २ विमाने उड्डाण करणार आहेत. त्यात १०९ लढाऊ विमाने, २४ हेलिकॉप्टर, ७ वाहतूक विमाने असतील.
‘वायू शक्ती’ सराव कार्यक्रमात भारतीय वायुसेनेचे जग्वार लढाऊ विमान आणि सुखोई फायटर जेट लढाऊ विमान सहभागी होणार आहेत. एअर मार्शल संदीप सिंग यांच्या मते, या संपूर्ण फायरपॉवर डेमोमध्ये सर्व विमानांसाठी त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार लक्ष्य आणि दारुगोळा निवडण्यात आला आहे. या सराव कार्यक्रमात भारतीय वायुसेनेची विमाने हवाई कसरती देखील दाखवणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
मोदींना युक्रेनमधील विद्यार्थ्यांचं काही पडलेलं नाही, राहुल गांधी आणि आम्ही.., शरद पवारांचे टीकास्त्र
दीपिकाने शेअर केले बेडरुम सिक्रेट; म्हणाली, “रणवीर नेहमी बेडवरच पडलेला असतो आणि…”
PHOTO: लतादीदींच्या नातीसमोर फिक्या पडतील सगळ्या अभिनेत्री, सचिन तेंडूलकरसोबत आहे खास कनेक्शन