के एल राहुल आणि रोहित शर्माच्या दमदार खेळीने भारताने मालिका जिंकली, रोहितने केला ‘हा’ विक्रम

रांची येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने प्रथम खेळून 20 षटकांत 6 बाद 153 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 17.2 षटकांतच हा सामना आपल्या नावावर केला आहे.

भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ६५ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली. दोघांनी 13.2 षटकात पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. राहुलने 49 चेंडूंच्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी रोहितने 36 चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि पाच षटकार ठोकले.

यासह रोहितच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 454 षटकारांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 हून अधिक षटकार मारणारा रोहित हा पहिला भारतीय आहे. चांगली सुरुवात केल्यानंतर रोहितने युवा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते.

अय्यर 11 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा काढून नाबाद परतला. याशिवाय ऋषभ पंतही 2 षटकारांसह 12 धावा काढून नाबाद परतला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर मार्टिन गप्टिल आणि डॅरेल मिशेल यांनी न्यूझीलंडला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.२ षटकांत ४८ धावा केल्या होत्या.

गप्टिल तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 31 धावा काढून बाद झाला. यादरम्यान गप्टिलचा स्ट्राइक रेट 206.67 होता. त्याचवेळी मिचेलने 28 चेंडूत 31 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये न्यूझीलंडची धावसंख्या ६० च्या पुढे होती. त्याचवेळी किवी संघाने 9 षटकांत 80 धावा केल्या होत्या.

यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. यादरम्यान मार्क चॅपमन 21, ग्लेन फिलिप्स 34, टिम सेफर्ट 13 आणि जेम्स नीसन 03 धावा करून बाद झाले. त्याचवेळी हर्षल पटेलने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली.

त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देत दोन विकेट घेतल्या. याशिवाय रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक यश मिळाले. अशा रितीने भारताने पहिली सिरीज आपल्या नावावर केली आहे. जरी भारताने शेवटचा सामना गमावला तरी सिरीज भारतच जिंकेल.

महत्वाच्या बातम्या
एबी डिव्हिलियर्सने जिंकली भारतीयांची मने; म्हणाला, मला याचा अभिमान आहे की मी अर्धा भारतीय
मरण्याआधी ‘ही’ गोष्ट करतो माणूस; अनेक मृत्यू पाहीलेल्या नर्सच्या खुलाश्याने उडाली खळबळ
हे सरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांची कृषी कायदे मागे घेण्यावर पहिली प्रतिक्रिया
ऐकावे ते नवलच! आता १ किलोमीटर लांबून वापरा वायफाय; सर्व कामे होतील अगदी काही मिनीटांत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.