भारताने वचपा काढला, इंग्लंडचा दारूण पराभव; इशान, विराटची धुंवादार खेळी

अहमदाबाद | भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यामधील दुसरा टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. यामध्ये भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे.

या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराजय स्वीकारावा लागला होता. परंतु भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने फक्त ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७.५ षटकात पूर्ण केले आहे.

दरम्यान, या सामन्यात भारताकडून इशान किशन या युवा फलंदाजाने पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात त्याने धावांचा पाऊस पाडला.

या सामन्यात इशान किशनने ५६ धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने नाबाद ६७ धावा चोपल्या. तर पंतने २६ धावांची खेळी केली. सामन्यात अखेर षटकार खेचत विराटने भारताला विजय मिळवून दिला.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.