Share

T20 World Cup : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात थरारक विजय

team india

T20 World Cup : नुकताच टी २० विश्वचषक २०२२ चा पाहिला सामना पार पडला. भारत विरुद्ध पाकिस्तान या पहिल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला आहे. भारताने ५ विकेट्स राखून पाकिस्तानचा पराभव केला आहे.

पहिल्याच सामन्यात विजय मिळवत भारताने विश्वचषकाची जोरदार सुरूवात केली आहे. त्यामुळे आता भारतीयांची दिवाळी गोड होणार अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने आपल्या पदरात विजय पत्करला आहे.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. यावेळी भारतीय संघाच्या अर्शदिप सिंग आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. या सामन्यात पाकिस्तानने भारतापुढे १५९ धावांचे लक्ष्य ठेवले.

परंतु, भारतीय संघ मैदानात उतरताच त्यांची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल प्रत्येकी चार धावा घेत बाद झाले. त्यानंतर सूर्यकुमार यादवला १० चेंडूत १५ धावा करत माघारी फिरावे लागले. पुढे हा सामना ३१ धावांत ४ विकेट्सवर येऊन ठेपला.

यावेळी विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने मैदानात उतरून संपूर्ण डाव पालटला. त्यानंतर हार्दिक पांड्या ३६ चेंडूत ४० धावा करत बाद झाला. हार्दिक पांड्यानंतर कार्तिक मैदानात उतरला.

पुढे नवाझने नो बॉल टाकला आणि विराटने षटकार मारत ही संधी साधली. शेवटी भारताला जिंकण्यासाठी १ बॉलमध्ये २ धावांची गरज होती. यावेळी विराट कोहलीच्या लक्षणीय खेळीने भारताला विजय मिळवून दिला. या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत भारतीयांची दिवाळी गोड केली आहे.

महत्वाच्या बातम्या
Virat Kohli : ‘शेवटी बाप बापच असतो’; किंग कोहलीने मॅच जिंकवताच भारतीय चाहत्यांनी पाकड्यांना धू धू धुतले
IND vs PAK : विराटच्या वादळात पाकीस्तान उद्धवस्त; ३६४ दिवसांनी भारताने घेतला पराभवाचा बदला
विराटने पाकिस्तानच्या जबड्यातून हिरावला विजयाचा घास; एका वर्षाने भारताने घेतला बदला, तोही व्याजासह
Chandrakant Khaire : अब्दुल सत्तारांचा बंदोबस्त करणार, त्यांची सगळी लफडी.., चंद्रकांत खैरेंचा इशारा

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now