रोहीतच्या नेतृत्वात भारताने केला न्युझीलंडचा सुफडा साफ; सलग तिसऱ्या सामन्यासह सिरीजही जिंकली

न्युझिलंडच्या विरुद्ध टी २० मालिका भारताने ३-० ने जिंकली आहे. यावेळी रोहित शर्माने कर्णधार म्हणून शानदार पदार्पण केले आहे. टीम इंडियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७३ धावांनी पराभव केला. अशाप्रकारे, संघाने मालिका जिंकली आहे.

या सामन्यात प्रथम खेळताना भारताने ७ विकेट १८४ धावा केल्या होत्या. रोहितने ५६ धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १११ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने ९ धावा देऊन ३ बळी घेतले.

आता 25 नोव्हेंबरपासून दोन्ही संघांमध्ये २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या टी-२० मालिकेत क्लीन स्वीप केला. याआधी संघाने न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर ५ सामन्यांच्या मालिकेत ५-० ने पराभूत केले होते.

लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात झाली. संघाने २ षटकात २१ धावा केल्या होत्या. यानंतर अक्षर पटेलने तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डॅरिल मिशेल (५) आणि सहाव्या चेंडूवर मार्क चॅपमन (०) यांना बाद करून प्रतिस्पर्धी संघाला दोन जोरदार धक्के दिले.

त्याने पुढच्याच षटकात ग्लेन फिलिप्सला (0) बोल्ड करून संघाला सामन्यात पुढे केले. आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये त्याने दुसऱ्यांदा ३ विकेट घेतल्या. न्यूझीलंडसाठी मार्टिन गप्टिलने अर्धशतक झळकावून संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला.

गप्टिलने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. ४ चौकार आणि ४ षटकार त्याने मारले. म्हणजेच त्याने सिक्स आणि फोर मारुनच ४० धावा केल्या. मात्र संघातील अन्य कोणताही खेळाडू टिकून राहू शकला नाही. न्युझीलंडचे ८ खेळाडू १० धावाही करू शकले नाहीत.

संपूर्ण संघ १७.२ षटकांत १११ धावांत ऑल आऊट झाला. हर्षल पटेलनेही २ बळी घेतले. न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. त्याआधी न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता. १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या टी २० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला होता.

दरम्यान, रोहित शर्माने सलग तिसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली. पण यावेळी त्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या. इशान किशन (२९ धावा) आणि रोहितने पहिल्या विकेटसाठी ६ षटकांत ६९ धावा जोडल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-
अमरावती हिंसाचार प्रकरणी भाजप कार्यकर्त्यांना पकडल्याने फडणवीस आक्रमक; दिला ‘हा’ इशारा
गोखलेंना वाटलं त्यांना पण पद्मश्री भेटेल म्हणून त्यांनी कंगनाच्या वक्तव्याला समर्थन दिलं; थोरात स्पष्टच बोलले
विधान परिषदेचं तिकीट कापल्यामुळे पंकजा मुंडेंनी सर्वांसमोर व्यक्त केली मनातील खदखद; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.