भारत-इंग्लंडचा शेवटचा कसोटी सामना का रद्द झाला?; दिनेश कार्तिकने सांगितली इन्साईड स्टोरी

भारतीय संघ आणि इंग्लंडमध्ये होणारा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्यामुळे भारतीय संघावर टीका केली जात आहे. पण सामन्याच्या आदल्या रात्री नक्की काय झालं होतं याबद्दल भारतीय संघाचा फलंदाज दिनेश कार्तिकने याबद्दल माहिती दिली आहे.

इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय खेळाडूंशी मी बोललो आहे. त्यांच्याकडून जाणून घेतले की ते मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवली जाणारी शेवटची कसोटी खेळण्यास का इच्छुक नाहि.

दिनेश कार्तिकने स्काय न्युजशी संवाद साधला आहे. मी काही भारतीय खेळाडूंशी बोललो. जवळजवळ सर्व सामने झाले आहेत, त्यामुळे ते खुप थकले आहे. त्यांच्याकडे सुरुवातील दोन फिजिओ होते. पण नंतर एक फिजिओ प्रशिक्षकासह संघापासून वेगळा झाला. पण त्यानंतर दुसरा फिजिओदेखील कोरोना पॉझिटीव्ह आला, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे.

दुसरा फिजिओ योगेश परमार कोरोना पॉझिटीव्ह आढळ्याने खेळाडूंमध्ये भिती निर्माण झाली होती. कारण पहिला फिजिओ कोरोनाबाधित आढळल्यानंतर सर्वच खेळाडू परमारच्या संपर्कात होते. गुरुवारी सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली, ती टेस्ट सर्वांची निगेटिव्ह आली पण भिती कायम होती, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे.

संघातील अनेक खेळाडू आदल्या रात्री तीन वाजेपर्यंत झोपू शकले नाही. त्यामुळे अशास्थितीत कोणताही खेळाडू दुसऱ्या दिवशीच्या सामन्यासाठी तयार होणे अशक्य आहे. दुसऱ्या दिवशीही सामन्याची तयारी करायची की नाही हे ठरलेले नव्हते, त्यामुळे दुसऱ्या दिवशीही रात्री खेळाडू नीट झोपू शकले नाही, असे कार्तिकने म्हटले आहे.

तसेच भारतीय संघावर टीका करणाऱ्या लोकांना हे पण समजले पाहिजे की ही मालिका संपताच आयपीएल सुरु होणार आहे. त्यानंतर वर्ल्ड कप आहे आणि त्यानंतर पुन्हा न्युझिलंडविरुद्धची मालिका आहे. पण आपण फक्त या आठवड्याबद्दल बोलतोय, असेही कार्तिकने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने चोरली तब्बल ६ कोटींची वीज; जाणून घ्या पुर्ण प्रकार
काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम
साकीनाका बलात्काराचा तपास करण्यासाठी जोत्सना रासम यांची नियुक्ती; जाणून घ्या कोण आहे जोत्सना रासम

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.