प्रसिद्ध कृष्णाने जिंकवली मॅच; पदार्पणातच ४ बळी घेत मोडले इंग्लंडचे कंबरडे

पुणे: पहील्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा ६६ धावांनी दारूण पराभव केला. नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आपल्या पहील्याच सामन्यात चार बळी घेत धडाकेबाज कामगिरी केली आहे. तोच या विजयाचा शिल्पकार म्हणावा लागेल.

आज भारत आणि इंग्लंड यांच्यात पहीला एकदिवसीय सामना सुरू आहे . हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडिअममध्ये खेळवण्यात आला. इंग्लंडने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. भारताने धडाकेबाज फलंदाजी करत इंग्लंडला ३१८ धावांचे लक्ष्य दिले होते. पण इंग्लंड फक्त २५१ धावाच करू शकले.

यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या वनडे पदार्पणातच कृणाल पंड्याने अर्धशतक झळकवले आहे. ३१ चेंडूत त्याने ५८ धावांची खेळी केली. तसेच गब्बर शिखर धवनने ९८ धावांची धमाकेदार खेळी करत भारताचा डाव सावरला. पण त्याला आपले शतक पुर्ण करता आले नाही. विराट कोहलीनेही ५६ धावांची खेळी केली आहे. त्यानंतर राहुलनेही आपले अर्धशतक झळकवले.

कृणाल पंड्यासोबत आज वनडेमध्ये वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यालाही संधी देण्यात आली होती. त्यानेही संधीचे सोने करत ५४ धावा देऊन ४ बळी घेतले. एकवेळी इंग्लंडने १४ षटकात बिनबाद १३५ धावा केल्या होत्या. पण त्याने इंग्लंडची जम बसलेली जोडी फोडत जेसन रॉयला बाद केले. तसेच धोकादायक बेन स्टोक्सलाही बाद केले.

कृणालने २०१८ मध्येही त्याने टी २० आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पण एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाकडून खेळण्याची संधी त्याला पहिल्यांदाच मिळाली आहे. यावेळी पदार्पन करणाऱ्या दोन्ही खेळाडूंना टीम इंडियाच्या खेळाडूंनी संघाची निळी टोपी दिली.

त्यावेळी टीम इंडियाची टोपी हातात घेताना कृणाल खुप भाऊक झाला. त्याला त्याच्या भावाने म्हणजे कृणालने टोपी सुपूर्त केली. त्याने ती कॅप घेतली आणि वरती आकाशाच्या दिशेने हलवली आणि आपल्या वडिलांना आदरांजली वाहिली. जानेवारीत त्याच्या वडिलांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

हे ही वाचा
पदार्पणातच फिफ्टी करणारा कृणाल पांड्या भर मैदानात भाऊ हार्दीकच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.