कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला मिळाले यश; अखेर १५ ऑगस्टनंतर येणार कोरोनावर लस

 

मुंबई। भारतात कोरोना विषाणूने चांगलाच थैमान घातला आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोना वॅक्सीनमध्ये भारताला यश मिळाले असून अखेर
१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाची लस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाचे २० हजाराच्या आसपास रुग्ण दरदिवशी वाढत असल्याने चिंता व्यक्त होत असतानाच आता ही दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात आणखी एका वॅक्सीनला मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

देशात ५ दिवसांच्या आत क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाच्या उपचारांसाठी काही औषधे बाजारात आली आहेत, पण उपचारासाठी याची पूर्णपणे हमी दिलेली नाही.

अशा परिस्थितीत केवळ कोरोना वॅक्सीनच कोरोनापासून लोकांना वाचवू शकते. मानवी चाचणीनंतर १५ ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

भारत बायोटेकला ७ जुलैला पहिल्यांदा मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. COVAXIN असे या लसीचे नाव असू शकते, असे देखील सांगण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हे वॅक्सीन कसे काम करेल हे पहिल्या मानवी चाचणीनंतरच समजेल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.