भारताला घाबरला पाकीस्तान! आता भारताच्या ‘या’ गोष्टीमुळे पाकीस्तानला भरली धडकी

पाकीस्तानच्या परमाणू परिक्षणाला २३ वर्ष पुर्ण झाले आहे. पाकीस्तानने भारताच्या परमाणू परिक्षणाला उत्तर देत हे धमाके केले होते. सध्या भारतापेक्षा जास्त परमाणू शस्त्र पाकिस्तानकडे आहे. असे असले तरी अंतरिक्षच्या बाबतीत म्हटलं तर पाकिस्तानकडे शस्त्रसाठा खुप कमी आहे.

अंतरीक्षच्या विषयात भारत पाकीस्तानच्या खुप पुढे असल्याने पाकीस्तानला नेहमीच खिजत असते. भारत सध्या अंतरीक्ष क्षेत्रामध्ये शक्तीशाली देशांमधला एक देश आहे. त्यामुळे पाकिस्तान स्वत: असुरक्षित समजते.

आता पाकीस्तानच्या परमाणू परिक्षणाला २३ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या वैज्ञानिकांनी पाकिस्तानची असुरक्षितता सर्वांसमोर मांडली आहे.

पाकिस्तानची प्रमुख मीडिया संस्थानच्या रिपोर्टनुसार, Pakistan quest for Peace and strategic stability in South Asia नावाच्या एका क्रायक्रमाचे नियोजन पाकीस्तानने केले होते.

या कार्यक्रमात दोन पॅनलिस्ट, रणनितीक योजना विभागाचे प्रमुख सल्लागार जमीर अकरम आणि परराष्ट्र कार्यालयाचे निर्देशक शस्त्र नियंत्रण आणि निरस्त्रीकरण कामरान अख्तर हे पण या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी भारतामुळे पाकीस्तानसमोर कोणकोणती आव्हान उपस्थित झाले आहे, याची चर्चा झाली आहे.

भारताचे अंतरिक्षमधले स्थान आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे सैन्यीकरण पाकीस्तानसाठी धोक्याचे असल्याचे पाकीस्तानने म्हटले आहे. तसेच भारताच्या आक्रमक भुमिकेमुळे पॅनलिस्टांनी चिंता व्यक्त केली आहे.

सध्या काही गोष्टी दुर्लक्षित केल्या नाही जाऊ शकत. भारत अमेरिकेसोबत मिळून शस्त्रसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच भारत आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि घातक शस्त्रसाठा वाढवत जात आहे, असेही अकरम यांनी या कार्यक्रमात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रतन टाटा देणार मुकेश अंबानींना टक्कर; ‘या’ कंपनीत करणार मोठी गुंतवणूक
महेंद्रसिंग धोनी आता झाला पुणेकर, पुण्यात घेतले घर, पाहा फोटो
होय हे खरं आहे! ‘बाहुबली’तील माहिष्मती काल्पनिक नाहीच, वाचा कुठे आहे हे अनोख राज्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.