ब्रेकिंग! ऑलम्पिकच्या भालाफेकमध्ये भारताचा नीरज चोप्रा फायनलमध्ये, सुवर्णपदकाकडे लागल्या सर्वांच्या नजरा

टोकियो ऑलम्पिक भारताला सुवर्ण पदकाची अपेक्षा असून त्याच्या दिशेने एक पाउल पडले आहे. आज भारताच्या नीरज चोप्राने जेलवीन थ्रो म्हणजेच भालाफेक स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. यामुळे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने भालाफेकमध्ये अंतिम सामन्यात जागा बनवली आहे.

नीरजने ८६.६५ चा थ्रो करत फायनल्समध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. नीरज चोप्राकडून पदकाची अपेक्षा केली जात असून त्याने क्वालिफाईंग राऊंडमध्येच आपले लक्ष्य स्पष्ट केलं आहे. ग्रुप ए मध्ये नीरज चोप्रा टॉपवर आहे. या खेळामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

तसेच भारतीय महिला हॉकी संघ ऑलम्पिक सुवर्ण पदकापासून दोन पावले दूर आहे. यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघाने इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आहे. यामुळे या संघाकडून देखील अपेक्षा आहेत.

ऑलम्पिकमध्ये आज महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे.

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघाने पहिल्यांदाच ऑलम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावले दूर आहे. आज हा सामना होणार आहे.

ताज्या बातम्या

देसी गर्ल प्रियांका चोप्रा अमेरिकेत विकतेय वडापाव, एका वडापावची किंमत ऐकून बसेल धक्का..

मासे धरायला गेलेल्या तरुणासोबत घडला भलताच प्रकार; खेकड्याने करकचून धरला प्रायव्हेट पार्ट आणि…; पहा व्हिडिओ

लालूप्रसाद यांनी शरद पवारांची घेतली भेट, भेटीचे कारण सांगताना लालूप्रसाद म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.