भारतावर जडला ब्रिटिश खेळाडूचा जीव; भारतबद्दल बोलला असं काही की तुम्हालाही अभिमान वाटेल

भारतात कोरोना व्हायरस वाढतच चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कोरोनाने आयपीएलच्या मैदानावर पण कोरोनाने एंट्री केली. त्यामुळे आयपीएलचे १४ वे पर्व स्थगित करण्यात आले आहे.

आयपीएल स्पर्धा संपली असली तरी खेळाडू भावून होताना दिसून आले आहेत. इंग्लंडचा खेळाडू जॉस बटलर याने भारतातल्या लोकांविषयी एक आभार पोस्ट लिहिली आहे. भारत लवकरात लवकर या आजारातून बरा व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

जॉस बटलरसाठी आयपीएलचे १४ वे पर्व खूपच खास ठरले. त्याने आपल्या कुटुंबासोबत आयपीएलचे दिवस खूप छान पद्धतीने एन्जॉय केले. त्याच्या लेकीचा वाढदिवस राजस्थान रॉयल्स संघाने खूप धुमधडाक्यात साजरा केला.

त्यामुळे बटलर याने भावुक पोस्ट ट्विटर वर शेअर केली आहे. जॉस बटलर ट्विटमध्ये म्हणतो की, ““भारत हा खूप खास देश आहे जो सध्या कठीण परिस्थितीतून जातोय. माझं आणि माझ्या कुटुंबाचं स्वागत करण्यासाठी मी तुमचा आभारी आहे, सुरक्षित रहा, आपली काळजी घ्या”,

राजस्थान रॉयल्स संघातून आयपीएलचा १४ वा हंगाम बटलर साठी खूपच खास ठरला. त्याने हैदराबाद संघाच्या विरुद्ध खेळताना धडाकेबाज शतक ठोकले. या हंगामामधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले.

राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना तो फलंदाजी चांगली करत होता. त्याने शतक करताना आपला फलंदाजीत फॉर्म चांगला असल्याचे दाखवून दिले होते. आयपीएलचा १४ वा हंगाम बंद झाल्यामुळे त्याची पण निराशा झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.