भारतासारख्या देशाला लसनिर्मितीचा फॉर्म्युला देऊ नये; बिल गेट्स यांचे वादग्रस्त वक्तव्य

देशात कोरोनामुळे सर्व देश ठप्प आहेत. लसीकरण केल्यानंतर याचा मोठा परिणाम दिसत असला तरी लसीकरणाचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत तेवढी लस आपल्याकडे नाही. यामुळे लसीचा निर्मिती मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे.

आता मात्र, याच लस निर्मितीवरुन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणारे बिल गेट्स यांनी एक आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भारतासहीत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये असे म्हटले आहे.

यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे. ब्रिटनमधील कायद्याच्या प्राध्यापिका तारा वान यांनी ‘भारतातील लोकांच्या मृत्यूला रोखले जाऊ शकत नसल्याचे बिल गेट्स यांनी म्हटले आहे. पश्चिमी देश भारताला मदत कधी करणार आहेत. अमेरिका आणि ब्रिटनने इतर विकसनशील देशांना ओलीस ठेवले आहे. हे अतिशय घृणास्पद आहे, अशा शब्दांत बिल गेट्स यांच्यावर टीका केली.

जगात अनेक कंपन्या कोरोना लस निर्मिती करत आहेत. सध्या जगातील लोक लसीच्या सुरक्षेबाबत अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे जगात सर्वांसोबत लसनिर्मितीचा फॉर्म्यूला शेअर केला जाऊ नये. लसनिर्मिती करणारी अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सन आणि भारतात लस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये मोठा फकर आहे, असे वक्तव्य बिल गेट्स यांनी केले.

लस निर्मितीचा फॉर्म्यूला हा एखाद्या पाककलेसारखा नाही, जो कोणालाही देता येईल. इथे बौद्धिक संपदेच्या हक्काची गोष्ट नाहीये. तर येथे सुरक्षेचा मुद्दा आहे. लस तयार करताना काळजी घ्यावी लागते, असे बिल गेट्स यांनी म्हटले आहे.

मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीका होऊ लागली आहे. कोरोना काळात लसीकरणाला वेग आला पाहिजे. लसीकरण हेच केवळ एक औषध यावर अनेक अंगाने प्रभावी ठरत आहे. यामुळे सर्व देशात लसीकरण गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

मराठा आंदोलनाचा भडका! मंत्री शंभूराज देसाईंच्या घरावर फेकले शेण, कार्यालयही फोडले

सुरेश रैनाने ट्विट करत ऑक्सीजन मागीतला; सोनू सूद म्हणाला १० मिनीटांत पाठवतो भावा

आजोबा लॉर्ड माउंटबॅटनचे आणि वडील जवाहरलाल नेहरूंचे केस कापायचे, वाचा जावेद हबीबची यशोगाथा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.