Share

भारत जगाला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत, मोदी सरकार मोठा निर्णय घेणार?

narendra-modi-

मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी गव्हाची निर्यात थांबवली आहे. यानंतर मोदी सरकार(Modi Government) निर्यातीच्या बाबतीत आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी सरकारकडून साखरेची निर्यात रोखली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या बाजारात साखरेचे दर तेजीत आहेत. हे दर कमी करण्यासाठी साखरेची निर्यात रोखली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.(india dont exoprt sugar modi government take decision)

काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली होती. आता मोदी सरकार साखरेची निर्यात बंद करण्याच्या तयारीत आहे. जगातील साखर निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ब्राझील देश यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने साखर निर्यात न करण्याचे धोरण अवलंबल्यास त्याचा फटका अनेक देशांना बसणार आहे.

भारत अनेक देशांना साखर निर्यात करतो. इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि मलेशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये भारताकडून साखर निर्यात केली जाते. भारतामध्ये साखरेचं सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये होतं. याशिवाय भारतातील गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार आणि हरियाणा या राज्यांमध्ये देखील साखरेचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं.

सध्या सुरु असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. रशिया आणि युक्रेन इतर देशांना गहू निर्यात करतात. पण युद्धामुळे गव्हाच्या निर्यातीत सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत गव्हाचे दर तेजीत आहेत.

भारतात देखील गव्हाच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी मोदी सरकारने गहू निर्यातीवर बंदी आणली होती. सध्या भारतात खाद्य तेलाच्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. भारतामध्ये खाद्य तेलाच्या किंमती प्रतिलिटर ७ ते १० रुपयांनी कमी झाल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या :-
संभाजीराजे छत्रपतींचा विषय आमच्या दृष्टीनं संपलाय; संजय राऊतांनी खडसावून सांगितलं
सचिन तेंडुलकरचा मुलाला खास सल्ला; म्हणाला, ‘अर्जुन मेहनतीचे परिणाम कधी ना कधी समोर येतील’
‘त्याची तंगडी तोडल्याशिवाय राहणार नाही’; राज ठाकरेंना नडणाऱ्या ब्रिजभुषणसिंगला मनसेची जाहीर धमकी

ताज्या बातम्या आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now