भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका 0-2 ने गमावली आहे. मालिकेतील तिसरा सामना 10 डिसेंबरला होणार आहे. पण 48 वे षटक दुसऱ्या वनडेतील टर्निंग पॉइंट ठरले. या षटकात एका स्टार भारतीय खेळाडूने अत्यंत खराब कामगिरी केली आहे.
या खेळाडूमुळेच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. गोलंदाजी आणि फलंदाजीत हा खेळाडू सपशेल अपयशी ठरला आहे. चला जाणून घेऊया या खेळाडूबद्दल. बांगलादेशसाठी मुस्तफिझूर रहमानने डावातील 48 वे षटक खेळले. या षटकात भारताने रहमानसमोर मोहम्मद सिराज आणि नॉन स्ट्राइक एंडला भारतीय संघ,मोहम्मद सिराज,रोहित शर्माउभा होता.
त्यानंतर टीम इंडियाला 3 षटकात विजयासाठी 18 चेंडूत 20 धावा हव्या होत्या, पण मुस्तफिजुर रहमानसमोर मोहम्मद सिराजला 48 व्या षटकात एकही धाव करता आली नाही आणि तो स्ट्राईक बदलू शकला नाही. रहमानने या षटकात मेडन फेकली. हे षटक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरले.
या षटकात रोहितला स्ट्राईक मिळाली असती तर तो मोठा फटका मारू शकला असता. पण हे होऊ शकले नाही. मोहम्मद सिराजने 12 चेंडूत केवळ 2 धावा केल्या. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही मोहम्मद सिराज खराब फ्लॉप ठरला. त्याच्याविरुद्ध विरोधी फलंदाजांनी खूप धावा केल्या आणि तो टीम इंडियाचा कमकुवत दुवा बनला आहे.
त्याने 10 षटकात 73 धावा दिल्या. ते महागात पडले. धावांवर नियंत्रण ठेवण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या वनडेत भारतीय संघाला 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी दुसऱ्या वनडेत भारताला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यासह बांगलादेशने तीन एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.
भारतासाठी रोहित शर्मा शेवटच्या टप्प्यात आला आणि त्याने अनेक स्फोटक फटके मारले आणि त्याने 28 चेंडूत 51 धावांची खेळी खेळली, पण तो टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय फलंदाजांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
sambhajiraje : शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची तोडफोड केल्यामुळे भडकले संभाजीराजे; म्हणाले आता मलाच कर्नाटकात जावून…
sharad pawar : सीमाप्रश्नावर वादग्रस्त विधाने करण्यापेक्षा शरद पवारांनी दत्ताची उपासणा करावी; महंतांचा सल्ला
india : श्वास रोखून धरायला लावणाऱ्या हायहोल्टेज सामन्यात भारताचा पराभव; जखमी रोहीत वाघासारखा लढला