terrorist attack : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानविरोधात इतरही महत्त्वाची पावले उचलली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून, युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक उच्चपदस्थ आणि राजकीय नेत्यांच्या कुटुंबांनी देश सोडण्यास सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या कुटुंबाने नुकतेच देश सोडले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना खासगी जेटद्वारे ब्रिटन आणि न्यू जर्सी येथे हलवण्यात आले आहे. आता पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) प्रमुख बिलावल भुट्टो यांच्या कुटुंबानेही पाकिस्तान सोडल्याचे समोर आले आहे. बिलावल भुट्टो यांच्या बहीण बख्तावर भुट्टो आणि आसिफा भुट्टो यांनी कॅनडात आश्रय घेतल्याचे वृत्त आहे.
विशेष म्हणजे, भारताने सिंधू करार थांबवल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी “पाणी थांबवल्यास रक्ताच्या नद्या वाहतील” अशी उघड धमकी दिली होती. परंतु त्यानंतर लगेचच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी देश सोडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमधील लष्करी अधिकाऱ्यांचेही मनोबल खचल्याचे सांगितले जात असून, अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षिततेच्या दृष्टीने परदेशात हलवले आहे. भारताच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने पाकिस्तानमध्ये अस्थिरता अधिकच वाढली आहे.
india-decides-to-cancel-indus-river-water-treaty-after-terrorist-attacks