दुःखद! भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

कोरोनामुळे देशावर मोठे संकट आले आहे. अनेकांचे मृत्यू यामध्ये होत आहेत. आता भारताची धडाकेबाज क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या घरातील दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

काही दिवासांपूर्वीच तिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले होते. आता त्या दुःखातून बाहेर येत नाही तोच तिच्या बहिणीचे देखील कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे घरातील अगदी दोन जवळच्या व्यक्तींचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

तिच्या बहिणीने वेदाला क्रिकेटर करण्यासाठी मोठे कष्ट घेतले होते. तिने बंगळुरुला येऊन वेदाला क्रिकेट अकादमीत टाकून तिला मोठी मदत केली होती. तिने तिच्यातील गुण हेरून तिला क्रिकेटपटू करण्याचा निर्णय घेतला होता.

मोठ्या संघर्षानंतर वेदा भारतीय संघात खेळू लागली. तेव्हा वत्सला यांचे स्वप्न पूर्ण झाले होते. तसेच ती म्हणाली, मी माझ्या आईला गमावलंय. तुम्ही कल्पना करु शकता, तिच्याविना कुटुंबाची मी आता कशी काय कल्पना करु? मी सध्या कोरोना निगेटीव्ह आली आहे.

तुम्ही काळजी घ्या. माझ्या सहवेदना त्या लोकांसोबत आहेत जे अशा मुश्किल परिस्थितीतून जात आहेत, अशा भावना तिने आई गेल्यानंतर व्यक्त केल्या होत्या. यामुळे वेदा कृष्णमुर्तीच्या कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.

२४ एप्रिल रोजी आपली आई गेल्याचे तिने ट्विट करुन सांगितले होते. त्याचवेळी बहीणही कोरोनाने संक्रमित असल्याने तिची तब्येत खराब असल्याचे तिने म्हटले होते. त्या ट्विटला १५ दिवस होत नाहीत तोपर्यंतच वेदाला आणखी एक दु:खद बातमी द्यावी लागली. ६ मे रोजी ट्विट करुन आपली बहीण आपल्याला कायमची सोडून निघून गेल्याचे वेदाने सांगितले.

ताज्या बातम्या

‘त्या’ दिवसापासून शिवसेनेचे कट्टर समर्थक नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक बनले

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्राची मुलगी आदिरा आहे बॉलीवूडची सर्वात श्रीमंत स्टार किड; बर्थडेला गिफ्ट मिळाला बंगला

सुंदरतेसोबतच व्यवसायामध्ये देखील खुप पुढे आहे सुनील शेट्टीची पत्नी; वर्षाला कमवते करोडो रुपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.