Sanjay Raut Letter To PM Modi : आशिया कप 2025 (Asia Cup 2025) मध्ये भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) क्रिकेट सामना खेळवण्यासाठी केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सामन्याला विरोधाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून कडाडून निषेध नोंदवला आहे.
संजय राऊत यांचे मुद्दे
या पत्रामध्ये खासदार संजय राऊत यांनी काही ठळक मुद्दे मांडले आहेत :
-
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 महिलांचे सिंदूर पुसले. त्यांच्या भावना आणि वेदना लक्षात घेतल्या का?
-
तुम्हीच म्हणाला होता की “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” मग आता रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे चालणार?
-
जर पाकिस्तानसोबत सामना न खेळल्यास व्यापार थांबवण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी दिली आहे का?
-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन सट्टेबाजी होते, ज्यामध्ये काही भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.
-
हे सामने दुबईत (Dubai) होत असल्याने सरकारने सहज परवानगी दिली, पण जर सामना महाराष्ट्रात झाला असता तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या शिवसेनेने निश्चित विरोध केला असता.
राऊत यांनी या पत्राद्वारे मोदी सरकारवर थेट प्रश्न उपस्थित करत विचारलं आहे की देशाच्या सुरक्षेपेक्षा क्रिकेट महत्त्वाचं का मानलं जात आहे? पाकिस्तानसोबत सामना खेळवणे म्हणजे देशातील शहीद कुटुंबियांच्या भावना डावलणे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.






