शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गाईच्या दूध खरेदी दरात वाढ

मुंबई | राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघाद्वारे केल्या जाणाऱ्या गाईच्या दूध खरेदीमध्ये २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दूध संघाच्या निर्णयामुळे गायीच्या दुधाला लिटरमागे २९ रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नव्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून म्हणजेच उद्यापासून केली जाणार आहे. मात्र खरेदीदरात वाढ होणार असली तरी विक्री दरात वाढ केली जाणार नसल्याचे या संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघही अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे मध्यंतरी दूध खरेदी दरात मोठी कपात झाली होती. शिवाय पाऊच पॅकिंगमधील दूध विक्रीत पूर्वीच्या तुलनेत ३५ टक्क्याने घट झाली आहे. या घटीमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच दूध संघांकडून कमी दरानं दूध खरेदी होत असल्याने राज्यातील शेतकरी आक्रमक झाले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अतिरिक्त ठरणारे दूध खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या
व्हा अधिक स्मार्ट! मोबाइलमध्येच बाळगा आपले आधारकार्ड; जाणून घ्या सविस्तर
‘मुंबई, पुणे प्रमाणे कोल्हापुरात भव्य आयटी पार्कची निर्मिती करणार’
नाथाभाऊंनी भाजपाला पाडले खिंडार! ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.