दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले? तज्ञ म्हणाले, आम्ही शिफारस केलीच नाही

नवी दिल्ली । देशात सध्या कोरोना लसीवर सुरू आहे. मात्र यामध्ये ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे. अनेकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यातच केंद्र सरकारने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर  दुप्पट केले होते. या निर्णयावर अनेकांनी टीका केली होती.

देशात लसीचा तुटवडा असल्याने दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्याचा दावाही अनेकांकडून करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.

आता मात्र लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, असा खळबळजनक खुलासा तज्ज्ञ गटातील सदस्यांनी केला आहे. यामुळे हे नक्की कोणाच्या सांगण्यावरून केले आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

यामुळे आता केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. याबाबत एम. डी. गुप्ते रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, ‘NTAGI च्या शास्त्रज्ञांनी लसीच्या दोन डोसमधील अंतर 8 ते 12 आठवड्यांपर्यत सहमती दर्शवण्यात आली होती. पण डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती.

NTAGI च्या अजून एका सदस्याने याबाबत माहिती दिली आहे. यामुळे आता केंद्र सरकार तोंडघशी पडले आहे. यामुळे केंद्र सरकारच्या लसींमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला गेला याबाबत आता कोणाकडे उत्तर नाही.

लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याबाबत संबंधित तज्ज्ञ गटात चर्चा झाली, हे खरे आहे. पण दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे करावे अशी शिफारस आम्ही केलीच नव्हती. असेही ते म्हणाले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

लय भारी! ‘मस्त चाललंय आमचं’, म्हणत शालूच्या डान्सने घातला सोशल मिडीयावर धुमाकूळ; एकदा पहाच..

धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

जगाची जिरवण्याच्या नादात चीनचीच जिरणार? या प्रकरणामुळे लाखो लोकांना मृत्यूचा धोका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.