गोस्वामींच्या अडचणींमध्ये वाढ! आता ‘या’ प्रकरणी अर्णव गजाआड जाणार?

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अंतरिम जामीन मिळाला आणि त्यांची तुरूंगातून सुटका झाली. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आल्याने मुंबई पोलिसांनी घरात घुसून त्यांना अटक केली होती.

अशातच अर्णब गोस्वामी यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडणार असल्याचे दिसतं आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुंबई येथील एम एन जोशी मार्ग पोलीस ठाण्यात अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात एफ.आय.आर. दाखल केली आहे. यामुळे अर्णव गोस्वानी यांच्यावर आता कारवाई होऊ शकते.

दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याला मा.रहा.ण केल्याचा आरोप अर्णव गोस्वामी यांच्यावर करण्यात आला आहे. आता याप्रकरणी अर्णव गोस्वामी यांच्यावर पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याचबरोबर दिवसेंदिवस गोस्वामी यांच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसतं आहे.

याचबरोबर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गोस्वामी यांनी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ अशा घोषणा देत ते कारागृहातून बाहेर पडले. त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. कारागृहा बाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली होती.

तसेच अर्णब गोस्वामी पुन्हा आपल्या रिपब्लिक टीव्हीच्या न्यूजरूममध्ये पोहोचले आणि त्यांनी पुन्हा ठाकरे सरकारवर हल्ला चढवला . आपल्या सहकाऱ्यांसोबत उभे राहून अर्णब गोस्वामी म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही हरला आहात.

 

महत्त्वाच्या बातम्या
बिहारमध्ये नाट्य! सत्तास्थापनेचा दावा करत तेजस्वींचे आमदारांना दिले ‘हे’ आदेश
एक वेळ होती की तुटलेल्या बॅटने सराव करावा लागत होता, आज आहे जगात १ नंबर बॅट्समन
गोस्वामींना दुसरा जबर धक्का! ‘या’ प्रकरणी अर्णव गजाआड जाणार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.