उत्तर प्रदेशातील नोएडामधील(Noida) एका माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर आयकर विभागाने(Income Tax) छापा टाकला आहे. आयकर विभागाने टाकलेल्या या छाप्यात घराच्या तळघरातून साडेसहाशे लॉकर्स जप्त करण्यात आले आहेत. या लॉकर्समध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपये सापडले आहेत.(income tax raid on ex ips officer home)
माजी सनदी अधिकारी आर. एन. सिंह(R.N.Singh) यांच्या घरावर तीन दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापा टाकला. यावेळी आर. एन. सिंह यांच्या घराच्या तळघरात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना साडेसहाशे लॉकर्स सापडले. या लॉकर्समधून ५ कोटी ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या पथकाने हे लॉकर्स आपल्या ताब्यात घेतले आहेत.
माजी सनदी अधिकारी आर. एन. सिंह यांचा मुलगा सुयश आणि त्याचे कुटुंब नोएडाच्या सेक्टर ५० या भागातील एका घरात राहत आहेत. पण आर.एन. सिंग त्यांच्या पत्नीसोबत मिर्झापूर येथे राहतात. माजी सनदी अधिकाऱ्याच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड ठेवल्याची माहिती प्राप्तिकर विभागाला मिळाली होती. यावर पथकाने छापा टाकला असता घराच्या तळघरात सुमारे साडेसहाशे खाजगी लॉकर्स आढळून आले.
आर. एन. सिंह यांचा मुलगा त्यांच्याच घरात असलेल्या तळघरामध्ये खासगी लॉकरची फर्म चालवतो. हे लॉकर भाड्याने दिले जातात. त्यामुळे या लॉकरशी आपला संबंध नसल्याचा दावा माजी सनदी अधिकारी आर.एन.सिंह यांनी केला आहे. माजी सनदी अधिकारी आर.एन. सिंह हे उत्तर प्रदेशात डीजी अभियोजन या पदावर काम करत होते.
हे लॉकर्स इतर लोकांना भाड्याने देण्यात आले आहेत, असे आर. एन. सिंह यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. ही फर्म आपला मुलगा चालवत असून आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे आर.एन.सिंह यांनी सांगितले आहे. तसेच या लॉकर्सपैकी आपले फक्त २ लॉकर्स असून त्यात आयकर विभागाला काहीच सापडलं नसल्याचा दावा माजी सनदी अधिकारी आर.एन.सिंह यांनी केला आहे.
आता हे सर्व पैसे सरकारी खात्यात जमा होणार आहेत. लॉकर्समधील हे पैसे कोणाचे आहेत? यासंदर्भातील माहिती अजून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेली नाही. अजूनही आयकर विभागाची आर.एन.सिंह यांच्या घरावर छापेमारीची कारवाई सुरुच आहे. माजी सनदी अधिकारी आर.एन.सिंह यांच्या तळघरात कोट्यवधींची संपत्ती सापडली आहे. या कारवाईची संपूर्ण नोएडा परिसरात चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ठाकरे सरकार वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पहिल्या दिवशी निवृत्ती अन् दुसऱ्याच दिवशी भाजपचे तिकीट; ईडीच्या अधिकाऱ्याला मिळाली विधानसभेची उमेदवारी
तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राच्या नात्यावर कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, लवकरच..