पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्यावरुन परत येताच बांग्लादेशातील हिंसाचार उसळल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधानन मोदी यांचा बांग्लादेश दौरा संपताच तेथे कट्टरपंथीय इस्लामिक गटांनी हिंदू मंदिरांवर हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कट्टरपंथी मुस्लीम संघटनेच्या शेकडो सदस्यांनी पूर्व बांग्लादेशमधील हिंदू मंदिरांवर आणि एका रेल्वेवर हल्ला केला. पंतप्रधान मोदी यांच्या बांग्लादेश दौऱ्याविरोधात या मुस्लीम संघटनेनं हा हिंसाचार घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.

इतकच नाही तर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत १० आंदोलकांचा मृत्यू झाल्याचीही माहिती हाती येत आहे.  मोदींनी शुक्रवारी बांग्लादेशाच्या ५० व्या स्वातंत्र दिनानिमित्त राजधानी ढाका येथे भेट दिली. दोन दिवसांचा दौऱा पूर्ण केल्यानंतर शनिवारी ते भारतात परतले.

यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना १२ लाख कोविड-19 लशीचा डोज भेट म्हणून दिला. तसे दुसरीकडे भारतात मुस्लिमांसोबत भेदभाव होत असल्याचा आरोप बांग्लादेशातील कट्टरपंथीयांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका कट्टरपंथी मुस्लीम संघटनेच्या जमावाने राजशाही शहरातील दोन बसेसना आग लावली. याशिवाय शेकडो आंदोलनकर्त्यांची नारायणगंजमध्ये पोलिसांसोबत हातापायी झाली. यांनी पोलिसांवर दगडफेक केली.

महत्त्वाच्या बातम्या 

आपला संसार अपूर्ण राहीला, पुढच्या जन्मी नव्याने सुरवात करू; माझी हार्डडिस्क फुटत आहे मला माफ कर

‘…तर लॉकडाऊनबाबत नियोजन करा’, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र; वाचा जसंच्या तसं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.