‘या’ गावात महिला नाही तर चक्क पुरुष सांभाळतात चूल; दिलं जातं स्पेशल ट्रेनिंग

पुदुचेरी। आज स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं देखील वर्चस्व आहे. घरातील जबाबदाऱ्या, मुलं आणि आपलं काम सांभाळणं काही सोपी गोष्ट नाही. मात्र एवढं करूनही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी लेखलं जात.

जरी स्त्री कितीही सुशिक्षित व शिकलेली असली तरी अनेकांच्या चूल व मुल आठवलं की लगेच घरची स्त्री डोळ्यासमोर येते. अनेक पुरूषांना महिलाच्या घरातील कामांमध्ये हातभार लावणे म्हणजे कमीपणा वाटत असतो, मात्र काही मोजके पुरूष असे असतात जे कायम स्त्रियांना कामात मदत करत असतात.

मात्र तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल पण, पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशात कलायुर नावाच्या गावात गेले 500 वर्षांपासून घरातलं स्वयंपाकघर पुरूष सांभाळत आहेत. व गाव स्वयंपाकी पुरुषांचं गाव म्हणूनच ओळखलं जातं. पुदुच्चेरीपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावामध्ये 80 घरं आहेत या प्रत्येक घरात तुम्हाला एक उत्तम शेफ भेटेल.

या गावातले पुरुष घरात वडिलांच्या हाताखाली स्वयंपाक शिकत नाहीत तर गावातील मुख्य शेफ (Chief Chef) त्यांना जवळजवळ 10 वर्षे स्वयंपाक कसा करायचा याचं ट्रेनिंग देतो. दक्षिण भारतीय सगळ्या रेसिपींचं ट्रेनिंग हा शेफ आपल्या गावातल्या कूकना देतो. या गावात 200 कूक आहेत.

त्या परिसरातील लग्न, इतर समारंभ आणि पार्ट्यांमध्ये हे कूकच जेवळ तयार करतात. हे सगळे मिळून एकावेळी 1 हजार माणसांसाठी जेवण तयार करू शकतात. आपल्या घरातील कामं दोघांनी मिळून करायची हे दोघांना माहीत असतं. त्यामुळे सामान भरण्यापासून ते रविवारच्या साफसफाईपर्यंत पुरूष घरातली सगळी कामं करतात.

एखाद्या रविवारी बायकोला आराम मिळावा म्हणून ते एखादी रेसिपी तयार करतात. पण संपूर्ण किचनचा भार स्वीकारलेले पुरूष अगदीच कमी. त्यामुळे या गावाकडून आदर्श घेता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या
दीपिका पादुकोनला का वाटते राहुल गांधींनी पंतप्रधान व्हावे? जाणून घ्या काय म्हणाली दीपिका..
स्म्रिती मंधानाच्या ‘त्या’ फोटोवर चाहते घायाळ, म्हणाले, बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा…
५ वेळा लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग, भावाच्या पत्नीवर बलात्कार, भोंदूबाबाचा कारनामा आला समोर
मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता हिंदू तरुण मात्र विरोध असल्याने उचललं असं पाऊल की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.