…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला

लॉकडाऊनमुळे कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. निर्बंध कमी झाल्यावरही बलात्कार, अपहरण, सायबर क्राईम, यांच प्रमाणही वाढलं आहे. नुकतेच साकीनाका प्रकरण शमता न शमता मुंबईत अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईतील विलेपार्ले परिसरात एका जावयाने स्वतःच्याच सासूला मारहाण करून तिची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केले आहे.

सदर घटना ही विलेपार्ले परिसरात घडली असून आरोपी हा तरुण तेथील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी आरोपीला पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. चोरीच्या प्रकरणात १ सप्टेंबरला आरोपी जामिन अर्जावर सुटून तुरुंगातून आला होता.

यादरम्यान त्याला समजले की, आपल्या पत्नीने आपल्या पाश्चात्य दुसर लग्न केलं असून त्या नवऱ्यापासून ती गरोदर देखील आहे. हे समजताच त्याला राग अनावर नाही. याच रागात तो थेट सासुच घर गाठलं घरी आल्यानंतर बायकोचं दुसर लग्न लावून दिल्या प्रकरणी सासू आणि जावयाच जोरदार भांडण सुरू झालं.

यावेळी आरोपीने तिला मारहाण केली. एवढंच नव्हे तर चाकूने सासूच्या गुप्तांगावर वार करून गुप्तांग दगडाने ठेचल. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पीडित महिलेला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले गेले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.सदर आरोपी हा १ सप्टेंबर रोजी जामिनावर सुटला होता. यानंतर २ सप्टेंबर रोजी त्याने सासूला मारहाण करून हत्या केली होती. या घटनेचा अधिक तपास विलेपार्ले पोलीस करत आहेत.

 

महत्वाच्या बातम्या
पैसा जाताच पोटच्या पोरीचीही माया आटली! राणू मंडलला वाऱ्यावर सोडून पोरगी फरार
“पवारांनी काँग्रेसची‌ काळजी करू नये, त्यांना अजून स्वत:च्या पक्षाचा मुख्यमंत्री करता आला नाही”
जुहूमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांमध्ये आणि क्लीनअप मार्शलमध्ये जोरदार हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
पती झोपेत असताना पत्नीने कात्रीने प्रायव्हेट पार्ट कापून अडकवला नटबोल्ट; ४० वर्षाचा तरुण विव्हळत राहिला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.