Share

UPSC : चारही भावंडांनी पास केली UPSC ची परीक्षा; कोणी आहे कलेक्टर तर कोणी एसपी

UPSC siblings in Up

UPSC : वर्षानुवर्षे अनेक विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससीची तयारी करतात. यात काहींना लवकर यश मिळते तर काहींना ते मिळण्यासाठी अनेक परिश्रम घ्यावे लागतात. अशीच यूपीएससी उत्तीर्ण केलेल्या भावंडानी समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. एकाच घरातील चारही भावंडांनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि चारही जण मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील लालगंज येथील एका कुटुंबात चार भावंडे आज IAS आणि IPS अधिकारी बनले आहेत. लालगंज येथील इटोरी या गावात अनिल मिश्रा नामक व्यक्ती राहतात. ते गावातील बँकेत बँक व्यवस्थापक म्हणून काम करतात.

मिश्रा यांना दोन मुले आणि दोन मुली असे एकूण चार अपत्य आहेत. योगेश, लोकेश, माधवी आणि क्षमा अशी त्यांची नावे आहेत. यापैकी योगेश हा सर्वात मोठा असून तो आयएएस अधिकारी आहे. त्याने त्याचे सुरुवातीचे शिक्षण लालगंज येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.

त्यांनतर त्याला नोएडामध्ये नोकरी मिळाली. पुढे त्याने दिल्लीमध्ये यूपीएससीचे क्लास केले. एक वर्ष जोमाने अभ्यास करून तो यूपीएससी उत्तीर्ण झाला आणि IAS अधिकारी म्हणून रुजू झाला. त्यांनतर त्याची बहीण माधवी मिश्रा हीसुद्धा यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत झारखंड केडरची IAS अधिकारी झाली. ती सध्या रामगड येथे डीएम म्हणून कार्यरत आहे.

त्यानंतर योगेशची लहान बहीण क्षमा ही सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत होती. तिला पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयश आले. त्यानंतर तिने चौथ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०१६ मध्ये IPS अधिकारी बनली. पुढे त्यांचा लहान भाऊ लोकेश हा २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेत ४४ व्या क्रमांकावर होता. आता तोसुद्धा IAS अधिकारी आहे. अशाप्रकारे अनिल मिश्रा यांची चारही मुले आज आयपीएस आणि आयएएस अधिकारीआहेत.

या चारही भावंडांनी मिळून एक आदर्श निर्माण केला आहे. सध्या त्यांनी एक कोचिंग सेंटर सुरु करून तिथे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या चारही भावंडांनी त्यांच्या आईवडिलांची मान उंचावली आहे. सगळीकडे यूपीएससी, एमपीएससी करून अधिकारी बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे उदाहरण दिले जाते.

महत्वाच्या बातम्या
ratan tata : घरातल्या मिठापासून ते चारचाकीपर्यंत सगळीकडेच TATA; रतन टाटांच्या मराठमोळ्या फॅनची तुफान चर्चा
Kolhapur : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात सापडला १२ व्या शतकातील ‘खजिना’; उलगडणार अनेक रहस्ये
shivsena : शिंदेंचं सरकार कोसळणार आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार; सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर मोठी अपडेट
Gulabrao Patil : “शंभर दिवस हिजड्यांसारखं जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखं जगा”

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now