शाळेत असताना टायरच्या पंक्चर काढायचा, जिद्दीच्या जोरावर २३ व्या वर्षी झाला कलेक्टर

भारतातील जेव्हां कठीण स्पर्धा परीक्षा विषयी आपण बोलतो तेव्हा UPSC परिक्षेचा उल्लेख केला जातो. दरवर्षी लाखोंच्या संख्येत विद्यार्थी ही परीक्षा देऊन आपण कसोटीवर खरे उतरतो का हे तपासून पाहत असतात. असच एका तरुणाने त्याच्या आयुष्यतील सर्व अडचणींवर मात करून जगातील सर्वात कठीण परीक्षा पास केली आहे आणि आज तो आयएएस (IAS ) अधिकारी बनला आहे.

या मुलाचे नाव वरूण बनरवाल आहे. वरूण हा एका गरीब कुटुंबातून आलेला मुलगा एकेकाळी बोईसर येथे सायकल पंक्चर काढायचा. वरूणच्या वडिलांचे सायकल पंक्चर काढण्याचे दुकान होते. सायकल पंक्चर काढूनच बनरवाल यांचं घर चालत असे त्यामुळे घरात खूप गरिबी होती. वरूणच्या आई वडिलांची वरूणला चांगल शिकवून मोठं करण्याची इच्छा होती कारण लहानपणापासूनच वरूण हा हुशार विद्यार्थी होता.

वरुण जेव्हा दहावीला होता तेव्हाच वरुणचे वडील आजारी पडले यावेळी वरुणने सर्वांची काळजी घेतली. वडिलांचा दवाखाना केला यामध्येच त्याने दहावीची परीक्षा दिली. परीक्षेनंतरच वडिलांचे निधन झाले. घरातील सर्वात मोठा असल्याच्या नात्याने सर्व जबाबदाऱ्या लहानपणातच त्याच्या अंगावर आल्या. वरुणने काम करायला सुरुवात केली. यामध्ये दहावीचा निकाल लागला आणि संपूर्ण शहरात वरुण दुसरा आला. त्याच सर्विकडे कौतुक करत होते यावेळी त्याच्या आईने त्याला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला तिने त्याला स्पष्ट सांगितलं तू शिक मी दुकान चालवेन.

पुढे शिकायचे होते मात्र पैश्याचा भार जास्तच होता. दहा हजार रुपये शुल्क होते. वरूण निराश झाला पण त्याने परिस्थीतीसमोर हात टेकले नाही. तो कॉलेजमध्ये जायचा, शिकवण्या घ्यायचा तसेच संध्याकाळी दुकानावर सुद्धा जायचा तिथे तो पुस्तकं वाचायचा.

अशा परिस्थितीत तो बारावी पास झाला यानंतर त्याला इंजिनियरिंगमध्ये रस होता. त्याला पुण्याच्या MIT कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. पहिल्या वर्षाची फिस त्याने शिकवण्या घेऊन तसेच जमीन विकून भरली पहिल्याच वर्षी कॉलेजमध्ये तो प्रथम आला. यानंतर त्याच्या मित्रांनी तसेच शिक्षकांनी देखील फिस भरण्यास मदत केली.

शेवटच्या वर्षाला अनेक कंपन्याकडून त्याला ऑफर आल्या पण समाजासाठी काहीतरी करावे असे त्याला वाटत होते म्हणून त्याने UPSC करण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षाच्या तयारीनेच तो UPSC पास झाला. संपूर्ण भारतात ३८ वी रँक काढून आयएएस ची पोस्ट काढली आणि अवघ्या २३ वर्षातच तो आयएएस अधिकारी झाला.

 

महत्वाच्या बातम्या
‘या’ ५ सोप्प्या स्टेप्स वापरा आणि घरातल्या कचऱ्यापासून बनवा उदबत्या; सुरु करा स्वतःचा व्यवसाय…
जिवंतपणीच आमदाराच्या मृत्यूची बातमी व्हायरल; संतप्त आमदार म्हणाले..
बेकरीतील खारी टोस्टवर पाय दिलेला व्हिडिओ पाहून संतापली रविना टंडन, म्हणाली..
शिवलीला पाटील यांचे किर्तन रंगणार बिग बाॅसच्या घरात; प्रथमच किर्तनकारांची एन्ट्री

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.