सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री

पुणे | मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिध्द अभिनेत्री प्रिया बेर्डे आता राजकरणात एन्ट्री करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.

येत्या ७ जुलै रोजी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मला बॅकस्टेज कलाकारांसाठी चांगले काम करण्याची इच्छा आहे. माझ्या कामाने त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, असे सारखे वाटते. त्यामुळे मी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच या कामात मला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल, असंही प्रिय बेर्डे म्हणाल्या आहेत.

पुढे त्या असेही म्हणाल्या की, मला करायच्या असलेल्या कामासाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी योग्य पक्ष निवडल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.

तसेच त्यांना करायच्या असलेल्या कामामागे पक्ष हिमतीने आणि ताकदीने उभा राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले आहेत.

प्रिया बेर्डे यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतल अनेक कलाकार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामध्ये सिद्धेश्वर झाडबुके, विनोद खेडकर, शकुंतला नगरकर, जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचा समावेश आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.