‘लॉकडाऊनमध्ये जोडप्याने पैशांसाठी सुरू केले सेक्स रॅकेट; असा झाला रॅकेटचा पर्दाफाश’

 

मुंबई | देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. लागलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत.

अनेक लोक लॉकडाऊनमध्ये पैसे कमवण्यासाठी मार्ग काढत आहे. असे असताना छत्तीसगडमध्ये एका जोडप्याने लॉकडाऊनमध्ये पैसे कमवण्यासाठी सेक्स रॅकेट सुरू केले होते. आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून २५० किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेटचे प्रकरण उघडकीस आणले आहे.

पती आणि पत्नी असे दोघे मिळून हे हाय-प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवत होते, अशी माहिती आहे.

चक्रधरनगर पोलीस स्टेशन जवळच्या एका हॉटेलमध्ये रोज नवीन मुली आणि अनोळख्या लोकांच्या हालचाली तिथल्या नागरिकांना दिसून आल्या.

यानंतर लोकांकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी एका स्थानिक व्यक्तीच्या माहितीने या हॉटेलवर छापा टाकला.

यावेळी पोलिसांनी पती-पत्नी आणि हॉटेल मालकाला अटक केली आहे. तसेच दोन मुली आणि एका मुलालाही यावेळी अटक करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.