कोरेगाव भीमा प्रकरणात निरपराधांना अडकवण्यासाठी तत्कालीन सरकारने खोटे पुरावे तयार केेले?

पुण्याजवळील भिमा-कोरेगाव येथे दोन वर्षांपुर्वी झालेल्या दंगलीप्रकरणी रोना विल्सन याला अटक करण्यात आली होती. या दंगलीप्रकरणी अमेरिकेतील एका सायबर कंपनीने दावा केला आहे की या प्रकरणात विल्सन याला अडकवण्यात आलं आहे. याचा खुलासा अमेरिकेतील अर्सेनल डिजिटल कंपनीने केला आहे.

पुणे पोलिसांनी दोन वर्षांपुर्वी रोना विल्सन याच्यासह १४ पेक्षा अधिक लोकांना UAPA अंतर्गत अटक केली होती. पोलिसांनी रोना विल्सन याचा लॅपटॉप जप्त केला होता. त्यामध्ये १० आक्षेपार्ह पत्रं मिळाली होती. या पत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा तसेच नक्षलवाद्यांकडून दारूगोळा आणि बंदूकांची मागणी केल्याचं नमूद केलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

अमेरिकेतील अर्सेनल डिजिटल या कंपनीच्या म्हणण्यानुसार विल्सनला अटक होण्यापुर्वी त्याच्या लॅपटॉपवर ‘नेटवायर’ या मालवेअरद्वारे नजर ठेवण्यात आली होती. त्याद्वारे १० पत्रे विल्सनच्या लॅपटॉपमध्ये प्लँट करण्यात आली. त्याच्या अटकेच्या २ वर्ष आधी हे सर्व करण्यात आलं होतं.

विल्सनच्या वकिलांकडून अर्सेनल कंपनीला हा लॅपटॉप मिळाला असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. तसेच लॅपटॉपशी छेडछाड करण्यासाठी आणि हॅक करण्यासाठी सायबर हल्लेखोरांकडे साधने होती. त्यांचा मुळ उद्देश विल्सनवर पाळत ठेवणे आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये आक्षेपार्ह पत्रं प्लँट करणे हा होता असं अर्सेनल कंपनीचं म्हणणं आहे.
म्हत्तवाच्या बातम्या-
मोठी बातमी! भाजप खासदार उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार
शिवसेनेच्या अडचणी वाढल्या! उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार ईडीच्या रडारवर
भाजपा नेत्याचं गृहमंत्र्यांना पत्र; ‘भारतरत्नां’च्या चौकशीचे आदेश मागे घ्या; आधी ‘त्या’ सेलिब्रिटींना धरा

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.